Ticker

6/recent/ticker-posts

माता रमाई जयंती उत्सहात साजरी.



प्रतिनिधी @समाधान भुतेकर

स्थानिक ईसरूळ येथे 7 फेब्रुवारी शुक्रवारी रमाई जयंती मोट्या उत्सहात साजरी करण्यात आली यावेळी गावातील सर्व जाती धर्माचे लोक, भीमसैनिक तरुणवर्ग व महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी भीमगीते व रमाबाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या नावाचा जयघोष करत गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. महिलांनी आपल्या सुंदर आवाजातून रमाई गिते गायली तर चिमुकल्यानी रमाई गीतावर लेझीम खेळत सुंदर मनमोहक असे नृत्य सादर करीत भीमसैनिकांचे मने जिंकली.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामस्थानी परिश्रम घेतले सर्व कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडले.