देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 पुरळ गावचे मतदान जनतेने शांततेने पार पाडले. या गावचे उमेदवार भाजप तर्फे श्री. संजय नामदेव बोंबडी हे उभे राहिलेले होते. व महिला उमेदवारामध्ये सौ.रंजना सत्यवान आळवे हे भाजप तर्फे उभे राहिल्या होत्या. दोन्ही उमेदवारांनी गावागावात जाऊन घराघरात जाऊन योग्यरीत्यांनी प्रचार केला. आपल्या पक्षाची बाजू मांडल्या व कामाची रूपरेषा सुद्धा लोकांना सांगण्यात आल्या. हे उमेदवार जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची उमेदवारी भाजप, शिवसेना,राष्ट्रवादी अशी होती. मतदानाच्या दिवशी लोकांनी अति उत्साहाने मतदान केले व शांततेने पार पाडले. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते साडेपाच अशी होती.
त्याचप्रमाणे मतदान शांततेने व कायदा सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी विजयदुर्ग पोलीस स्टेशन व देवगड पोलीस स्टेशन यांनी सुद्धा सहभाग घेतलेला होता. मतदानात कुठचाही अनुचित प्रकार किंवा कायदेभंग होऊ नये याची ते खबरदारी घेत होते. त्याचप्रमाणे यांच्या विरोधात उभे ठाकलेले शिवसेनेचे उबाटा पक्षाचे उमेदवार सुद्धा रिंगणात उमेदवारीसाठी उभे राहिले होते. त्यांनी सुद्धा प्रचार घरोघरी जाऊन केला. दोन्ही पक्षातर्फे मतदान बूथ लावली गेली होती. व त्यांचे कार्यकर्ते वेळोवेळी ते मतदारांना मार्गदर्शन करत होते. असे हे मतदान कलंबई गाव, पुरळ गाव, खालचे वरचे केळेये वाडी, येथील ग्रामस्थानाने शांततेने पार पाडले. सर्वात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याची मोलाची कामगिरी पोलीस डिपार्टमेंटनी योग्यरित्या केली. तेव्हा पुरळ गावातील ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत. मतदान ठीक संध्याकाळी साडेपाच वाजता बंद करण्यात आले. जनतेने योग्यरीत्या मतदान केले. कुठचाही अनुचित प्रकार झालेला नाही. तेव्हा या निवडणुकीत जे निवडून येतील ते योग्य रित्या देशाची सेवा करावी ही ईश्वरचरणी जनतेकडून प्रार्थना.
.





Social Plugin