यशवंत पवार कन्नड
दिनांक 19/02/2026 रोजी कन्नड शहरातील गिरणी ग्राउंड येथे शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने वेस्टेज बॅनर व टाकाऊ साहित्यापासून तब्बल 30 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली. तब्बल 19,200 सर्कलमध्ये रंग भरून ही आकर्षक शिवप्रतिमा तयार करण्यात आली.
या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन भाजपा नेते उद्योजक श्री. मनोज भाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर पारंपरिक सांस्कृतिक पद्धतीने भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये वारकरी संप्रदायाकडून टाळ-मृदुंगाच्या गजरात वातावरण भक्तिमय करण्यात आले.
तसेच शिवकालीन परंपरा जपत विविध पारंपरिक खेळांचे सादरीकरण करण्यात आले. लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांसारखे शौर्यदर्शक खेळ गिरणी ग्राउंड येथे सादर करण्यात आले. विशेष म्हणजे या मिरवणुकीत डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात आला. ढोल पथक व लेझीम पथकाच्या तालावर शिवभक्तांनी जल्लोष केला.या कार्यक्रमात शाळकरी मुलं-मुली तसेच युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. (संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन युवा पर्व फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी उपस्थित युवा पूर्व फाउंडेशनचे क्षितिष भैय्या पवार ,मयुर राठोड, शिंदे गटाचे शहर प्रमुख राम काका पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पदाचे नगर सेवक सुरेश डोळस पाटील , शिंदे गटाचे नगर सेवक संदीप घोंगते, नगर सेवक अजीम शहा,पंचायत समिती सदस्य मुख्तार भाई शहा , सनातनी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संदेश पवार,भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इम्रान भाई शेख, मनोज देशमुख, अनिल भाऊ खंबाट,भाजपा युवमोर्चा तालुका अध्यक्ष पवन ठाकूर, सागर पाटील ,सोमनाथ दाभाडे, बंटी सातदिवे, सचिन जाधव, गोकुळ राठोड, या प्रसंगी विविध सर्वपक्षीय नेते, मान्यवर व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.





Social Plugin