Ticker

6/recent/ticker-posts

अति थंडीमुळे आंबा बागायतदार चिंताग्रस्त आंबा फळ बागायत शेतकरी चिंताग्रस्त




देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के 

ग्रामीण महाराष्ट्र न्यूज 

 यंदा कोकणातील आंबा लागवडीचा विषय शेतकऱ्यांना चिंताग्रस्त असा आहे. कारण असे की बदलणारे हवामानाचे अंदाज कमी प्रमाणात थंडी किंवा अति थंडी याच्यामुळे आंब्याच्या मोहरावर बहुतेक परिणाम झालेला आहे. पावसाचे प्रमाण यंदा वर्षी अधिक असल्यामुळे नोव्हेंबर पर्यंत थंडी हा विषय फार कमी होता. पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आंब्याचा मोहर लवकर येऊन सुद्धा त्याच्यावर कणी हा विषयच नाही आहे. आंब्याच्या बागा मोहरान फुलल्या पण त्याच्यावर आंब्याचे बीज नाही याचे कारण निसर्गात असंतोलपणा झालेला आहे. कोकणातील आंबा फळबाग व्यापारी व शेतकरी या बदलत्या हवामानाच्या वातावरणामुळे चिंताग्रस्त आहेत. यंदा आंब्याच्या बागेत आंबा हा फार कमी प्रमाणात आहे. सध्या आंब्याची स्थिती कणी सेटिंग  होण्यासाठी जे वातावरण लागते हवेचे ते अजून पर्यंत व्यवस्थित असे निर्माण झालेले नाही आहे. आंबा फळबाग शेतकरी आंब्या वर जी फवारणी करत आहेत ती योग्यरित्या करून त्याच्यावरील कीटक वेळेनुसार फवारणी करून मारत आहे. अशा अवस्थेत सुद्धा आंबा होईलच की नाही याची शाश्वती शेतकऱ्यांना आहे कारण आंब्याला जे बीज निर्माण होते जी फळधारणा होते ती निसर्गाकडून झालेलीच नाही आहे. 

परिणामी कोकणातील आंबा शेतकरी चिंताग्रस्त आहे. वातावरणात असमतोलपणा, पावसाचा प्रमाण जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा जमिनीत मारा, रासायनिक केमिकल औषध यामुळे आंबा फळावर परिणाम झालेला आहे. यंदा ज्यांच्या झाडाला आंबे आहेत त्यांनी पहिला मोहर जेव्हा आला तेव्हा त्यांच्या जे आंब्याचे बीज होते ते टिकण्यासाठी दुसरा मोह राला ते त्याने कुठून  आंबा फळ काही शेतकऱ्यांनी टिकवलेले आहे. तेव्हा यंदा आंबा हा उशिरा किंवा कमी प्रमाणात आहे असे शेतकऱ्यांना दिसून येत आहे. आंबा फळ हे पीक सध्या वर्षी धोक्यात आहे असे दिसून येत आहे. कारण बदलणारे हवामान हे या गोष्टीला कारणीभूत आहे. कारण आंबा यंदा ची झाडे आहेत ती मोहराने भरपूर फुलली पण त्यांना बीज निर्माण व्हायला पाहिजे, फळधारणा व्हायला पाहिजे असे पोषक वातावरण यंदा हवामानात दिसून येत नाही. तेव्हा यंदा आंबा फळ बागायत शेतकरी चिंताग्रस्त आहेत. सध्या वातावरणामध्ये उष्णतेचे प्रमाण सुद्धा व थंडीचे प्रमाण सुद्धा आहे त्यामुळे आंबा पिकावर परिणाम होत आहे निसर्गात समतोलपणा नाही याचा परिणाम आंबा झाडांवर होत आहे. कोकणातील शेतकरी भारी भारीतली कीटकनाशके औषध मारून आपले आंब्याचे पीक कसे येईल याची तो काळजी घेत आहे. परंतु निसर्गापुढे कोणाचे काही चालत नाही. म्हणून निसर्गातला हवेचा बदल हा आंबा झाडांना पोषक असा होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून शेतकऱ्यांना भरभराटीचे आंब्याचे पीक येऊ ही प्रार्थना.