रिसोड प्रतिनिधी : विजय गायकवाड
रिसोड : येतील स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रा डॉ सिद्धार्थ इंगोले यांना कला व साहित्य यातील योगदानाबद्दल शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे कार्यालयीन प्रमुख (OS) श्री संतोष शेरे यांच्या हस्ते तर इंग्रजी विभागाचे प्रा डॉ प्रकाश हनवते यांना आदर्श शिक्षक शहरी भागातील शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ किरण शेळके यांच्या हस्ते शाल बुके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना प्रा डॉ शेळके हे म्हणाले की दोघांनीही आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ते या पुरस्कारास पात्र आहेत तर मुख्य लिपीक श्री संतोष शेरे म्हणाले की या दोघांनाही हा पुरस्कार मिळाला म्हणजे त्यांचे कार्य संपलेले नाही तर यापुढेही त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतच राहावे असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रा डॉ आदिनाथ बदर, प्रा डॉ अमरदीप जाधव, प्रा डॉ प्रमोद फाटक, प्रा डॉ जितेंद्र बोरसे, व प्रा भूषण सावळे व कर्मचारी उपस्थित होते.





Social Plugin