Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी संशोधन क्षेत्रातील संधी समजून घ्याव्यात. प्रा ...डॉ.संदीप किर्दत .

 


छायाचित्र - पुसेगाव -  कला व वाणिज्य महाविद्यालयात "पीएच.डी.प्रवेश परीक्षेची तयारी ", या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ संदीप किर्दत ,प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले,प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर,प्रा.डाॅ.सचिन निकम,प्रा. श्रीमती मुल्ला आर.के. छाया - प्रकाश राजेघाटगे बुध 

बुध  दि . [प्रकाश २ाजेघटगे ]

 मानवी जीवनातील निर्माण झालेल्या समस्या सोडविण्यासाठी संशोधकांचे  योगदान व कष्ट महत्त्वाचे असते असे प्रतिपादन   रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व सहयोगी प्राध्यापक प्रा .डॉ . संदिप किर्दत यांनी केले.

पुसेगाव येथील, कला व वाणिज्य महाविद्यालयात हिंदी विभाग आयोजित "पीएच.डी.प्रवेश परीक्षेची तयारी " या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले,रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर ,रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर प्रा.डाॅ.संदीप किर्दत ,प्रा.डॉ.सचिन निकम,प्रा.श्रीमती मुल्ला आर.के. इत्यादी उपस्थित होते. 

 पुढे आपल्या भाषणात डॉ.किर्दत म्हणाले,"विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीच्या चढत्या आलेखात संशोधकांनी केलेल्या नवनवीन संशोधनाचे  अनमोल योगदान आहे. ज्या व्यक्तींना प्रश्न पडले व समस्या दिसल्या त्या व्यक्तींनी मानवी जीवन सुखकर करण्यासाठी प्रयोग , निरीक्षण, परीक्षणातून नवनवीन शोध लावले. संशोधनात वैज्ञानिक क्षेत्रात महत्त्व आहे. तितकेच महत्त्व सामाजिकशास्त्रे व भाषा व साहित्य क्षेत्रातील संशोधनाला आहे. संशोधनातील निष्कर्ष हे सरकारी धोरण ठरविण्यासाठी व नागरिकांमध्ये अपेक्षित बदलासाठी उपयुक्त ठरतात. संशोधकांनी सरकारी व खासगी क्षेत्रातील करिअरच्या संधी समजून घ्याव्यात असे आवाहन केले .

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजेंद्र भोसले   म्हणाले ," शिक्षण क्षेत्रातील पीएच.डी.पदवी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे संशोधन,अध्ययन व लेखनामध्ये अभिरूची असणे महत्त्वाचे असते. पीएच.डी.प्रवेश परीक्षेसाठी संशोधन पद्धती व विषयज्ञान याला अधिक महत्त्व आहे.प्रवेश परीक्षेतील गुण व तोंडी परीक्षेतील गुण यांच्या आधारे मेरीट लिस्ट प्रकाशित केली जाते. पीएच.डी. संशोधन करताना विद्यापीठाकडून एक मार्गदर्शक दिले जातात.मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनानुसार विषय निश्चित करुन संशोधन करुन अंतिमत: विद्यापीठाकडे शोध-प्रबंध सादर केला जातो. शोध-प्रबंधाचे परीक्षण होऊन तोंडी परीक्षेनंतर पीएच.डी.म्हणजेच डॉक्टरेट घोषित केली जाते.कष्ट करण्याची तयारी असणारे संशोधक हे संशोधनातून आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. पीएच.डी.केल्यानंतर  सिनियर कॉलेज मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक पात्रता मिळते. संशोधकाला  बॅकिंग, एन.जी.ओ., राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या, उद्योग व मीडिया या क्षेत्रात  संधी आहेत.

      अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ.राजेंद्र भोसले यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनामध्ये न्यूनगंड न बाळगता गुणवत्ता व उच्च पदवी संपादन केली पाहिजे.पीएच.डी. पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी  यशस्वी होतोच.पीएच.डी.केल्यानंतर अर्थाजन बरोबर समाजात सन्मान ही मिळतो.संशोधक विद्यार्थ्यांला समाजासाठी बौद्धिक योगदान दिल्याचे समाधान मिळते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संजय क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा.राबन मुल्ला यांनी मानले .यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.