Ticker

6/recent/ticker-posts

जालना महानगरपालिका महापौर पदी श्रीमती वंदना अरुण मगरे तर उप महापौर पदी राजेश राऊत



जालना । प्रतिनिधी संजीव पाटील।

 जालना महानगरपालिका पहीला महीला महापौर होण्याचा मान  श्रीमती  वंदना अरुण मगरे यांची निवड निश्चित झाली आहे.तर उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांची निवड निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या उपस्थिती तीत झालेल्या बैठकी नुसार भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण , महाराष्ट्र राज्य महानगरपालिका निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावन कुळे,माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार त मी था पंचायत राज समिती अध्यक्ष संतोष दानवे, आमदार  भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार तथा मनपा निवडणूक प्रचार प्रमुख, कैलास गोरंट्याल, भाजपा  महानगर अध्यक्ष यांच्या उपस्थितीत बुधवारी 5 फेब्रुवारी रोजी महत्वाची बैठक संपन्न झाली यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील स्त्री राखीव असलेल्या जागेसाठी  श्रीमती  वंदना अरुण मगरे यांची महापौर पदी निवड करण्यात येणार आहे तर उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांची निवड करण्यात येणार आहे. तसे आदेश काढण्यात आला आहे. ही निवड 15 महीने सव्वा वर्षा साठी ही निवड करण्यात येणार आहे. पाच वर्षात जालना महापालिकेला मिळणार चार महापौर, आणि चार उपमहापौर. भाजपा कडे अनुसूचित जाती च्या चार महीला नगर सेवक आहेत प्रत्येकीला महापौर पद मिळणार आहे.