प्रतिनिधी@ज्ञानदिप पाटील पारोळा
शिक्षकांच्या कौशल्याला राज्यस्तरापर्यंत संधी देऊन त्यांच्या विविध कौशल्य सादरीकरण आणि कलागुणांना वाव देत विद्यार्थी हित लक्षात घेऊन त्यांया अध्यापन कौशल्य विकसित करण्यासाठी भाषिक विकास आणि त्याच्या सादरीकरण क्षमतेला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे (SCERT )यांच्यामार्फत आयोजित विविध प्रकारच्या राज्यस्तरीय स्पर्धां जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धुळे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत जि.प.शाळा महाळपूर तालुका पारोळा ,येथील उपक्रमशील व गुणवत्तापूर्वक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौ. प्रणोती प्रमोद सोनवणे यांनी शब्दकोडे निर्मिती या स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या शब्दकोडे निर्मिती स्पर्धेमध्ये त्यांनी विद्यार्थांच्या वयानुरूप दर्जेदार व निकषांची पूर्तता करीत शब्दकोडे निर्मिती मध्ये ठसा उमटविला.
सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातून सर्वच विभागातून हजारो शिक्षक व अधिकारी वर्गाने उस्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता. सर्व स्पर्धक हे आपापल्या विभागातून प्रथम ते तृतीय क्रमांक प्राप्त करून या स्पर्धेसाठी पात्र झाले होते.सदर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, अत्यंत चुरशीची झाली.
अध्यापना बरोबरच सौ. प्रणोती प्रमुख सोनवणे यांचा विविध क्रीडा स्पर्धा तसेच कला गुण दाखविणाऱ्या रांगोळी किंवा चित्रकला स्पर्धांमध्ये नेहमीच सहभाग घेऊन यश प्राप्त आलेल्या आहेत.आताही राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत ते नाशिक विभागातून पात्र झालेल्या होत्या. सौ . प्रणोती सोनवणे या नेहमी विद्यार्थ्यांना आवडेल असे विविध उपक्रम राबवून समाज उपयोगी कार्यात नेहमी सहभाग दिलेला आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पारोळा तालुक्याचे गट विकास अधिकारी मा.भूषण कदम, पारोळा तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी मा.विश्वासराव पाटील साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी सी.एम.चौधरी तसेच केंद्रप्रमुख सन्माननीय करुणा देवकर मॅडम, यांच्यासह महाळपूर येथील सरपंच श्री. सुधाकर पाटील ,सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.श्याम देवरे,शाळा मुख्याध्यापक श्री.चव्हाण तसेच पालक विद्यार्थी ,पारोळा तालुक्यातील सर्व शिक्षक संघटना, पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





Social Plugin