Ticker

6/recent/ticker-posts

तिडके पाटील विद्यालयाची साखर कारखाना क्षेत्रभेट संपन्न.







प्रतिनिधी:- मोहन जाधव.

                   रयत शिक्षण संस्थेच्या मारुतीराव दगडूजी तिडके पाटील विद्यालयाची रयत गुरुकुल प्रकल्पांतर्गत क्षेत्रभेट कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोळपेवाडी या कारखान्याला शैक्षणिक भेट ३ व ४ फेब्रुवारी रोजी दिली. या भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळावी हा होता. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया, यंत्रसामग्री, सुरक्षितता नियम, व्यवस्थापन पद्धती तसेच कामगारांचे कार्य यांची सविस्तर माहिती देण्यात आली. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. भविष्यातील करिअर निवडीसाठी ही भेट मार्गदर्शक ठरणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या वेळी शाळेतील शिक्षक, शिक्षिका तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. क्षेत्रभेटीचे नियोजन रयत गुरुकुल प्रमुख श्री.माळी ए.पी. यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. तसेच क्षेत्रभेटीदरम्यान कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे उद्यानाचा निसर्गरम्य परिसर विद्यार्थ्यांनी बघितला तसेच विष्णू मंदिर श्री स्वामी समर्थ केंद्र तसेच कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान अतिशय छान पद्धतीने स्मृती जतन करून ठेवलेल्या विद्यार्थ्यांनी अनुभवल्या. 

      त्याचप्रमाणे या क्षेत्रभेटीदरम्यान सुरेगाव येथील पूर्व वाहिनी गोदावरी नदी शेजारी भगवान श्रीकृष्ण मंदिर प्रख्यात व पवित्र असे तीर्थस्थान आहे. महानुभव पंथी भाविक भक्तगण तीर्थयात्रेस या मंदिरासही भेट देतात. हे मंदिर अतिशय भव्य दिव्य असे गोदावरी नदी शेजारी बांधले गेलेले आहे. या मंदिराला विद्यार्थ्यांनी भेट देऊन दर्शनाचा आनंद घेतला.

ही क्षेत्रभेट यशस्वी होण्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक (एम.डी.)सोमनाथ बोरनारे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच तिडके पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक मांडवडे ए.आर.पर्यवेक्षक दवंगे एस.यु.मोरे आर.के,सारबंदे एन.एच, शेख आर.एन, कुशारे डी.एन,राऊत एस.एल, निळकंठ पी.ए, गोडे एस.एम, बागुल जी.एम, थोरात के.जी, सोनवणे एस. व्ही,गुंजाळ बी.व्ही, कदम एन.आर,चौधरी एच.एस.कोल्हे एम.एल,भुजबळ पी.एच,शिळकंदे व्ही.ए,गोपाळे एस.के,कापडणीस एच.डी,लांडगे व्ही.पवार आर.बी,मोहन जाधव या सर्व सेवकांनी प्रयत्न केले.