देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के
दर सालाबाद प्रमाणे यंदाही श्री क्षेत्र कुणकेश्वर देवगड येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेली जत्रा अतिशय उत्साहाने व आनंद पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. अनेक कार्यकर्त्यांनी हिराहिरीने भाग घेऊन मंडपाची सजावट विद्युत रोषणाई व शिवपिंडाची पूजा अर्चना मंदिरासाठी लागणारे पूजा पाठ पुरोहित त्याचप्रमाणे देवस्थानातील ट्रस्टमधील मान्यवर यांनी मंदिराची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने राखलेली गेली होती. त्याचप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्याची सजावट ही अतिशय देखणी अशी स्वरूपातली होती. विद्युत रोषणाईमुळे जसे काही स्वर्गाचा अनुभव येत आहे असे वाटत होते अशी विद्युत रोषणाई व मंदिराची डागडुजी साउंड सर्विस विलोभनीय असे केले गेले होते. श्री क्षेत्र कुणकेश्वर या मंदिराचे कार्यकर्ते दिवस रात्र शिवभक्तांची चांगली सोय करत असताना दिसले. त्याचप्रमाणे दुकानदार, चहा स्टॉल वाले, हॉटेल वाले असे अनेक दुकानदार आपापले दुकान शिस्त व नियमाचे पालन करताना दिसले.
श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील ग्रामस्थ अतिशय हिराहिरीने भक्तांची सोय करताना दिसले. कोकणात अनेक ठिकाणी महाशिवरात्रीचा सण हा अतिशय भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा केला जातो. अनेक ग्रामस्थानाची स्थानिक भजने ही सुद्धा येते अतिशय उसापूर्वक केली जातात. अनेक भक्तांचे येथे नवस फेडले जातात. त्याचप्रमाणे देव व त्यांचे भक्तगण या महाशिवरात्रीनिमित्त अनेक जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते राबवले जातात व जी मंदिराची काही देवाची जी काम असतात ती सुद्धा महाशिवरात्री निमित्ताने मंदिरामध्ये केली जातात. अनेक मान्यवर श्री क्षेत्र कुणकेश्वर उपस्थितीत राहून शिवपिंडाची पूजा अर्चना करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या तीर्थक्षेत्राला भेट देऊन ईश्वरचरणी प्रार्थना करून महाशिवरात्रीची पूजा संपन्न करतात. त्याचप्रमाणे महाशिवरात्रि चा बंदोबस देवगड पोलीस ठाणे, सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा, सागर रक्षक दल, कोस्टल गार्ड, होमगार्ड यांचा सहभाग फार सुरक्षेतेच्या दृष्टीने महत्त्वाचा असा आहे.
अनेक मुंबईतून चाकरमानी त्याचप्रमाणे पर्यटक देश विदेशातून माणसे या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवपिंडीच्या दर्शनाला येतात. असे हे महाशिवरात्रीचे दर सालाबाद प्रमाणे सण विविध कार्यक्रमाने व संस्कृतीने साजरे केले जातात. यंदा श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा ही तीन दिवसाची असून अनेक गावातील देव रिवाजाप्रमाणे आंघोळी करायला समुद्रावर येतात. अनेक भाविकांची गर्दी ते पाहण्यासाठी समुद्रावर होत असते. असे या श्री क्षेत्र कुणकेश्वर देवगड या महाशिवरात्री यात्रेचे महत्त्व काही औरच आहे. अतिशय भक्तिमय व आनंद पूर्वक असे वातावरण श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दिसते. तेव्हा अशा या श्री क्षेत्र कुणकेश्वर यांना आमच्या भाविकांचे कोटी कोटी प्रणाम





Social Plugin