महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी उध्दव कवळे
नांदेड/हदगाव तालुक्यातील, वायपना बु येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काल वार्षिक स्नेहसमेलन साजरे झाले. या मध्ये इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.या मध्ये स्वच्छता शिक्षण आरोग्य या विषयावरती मुलांनी नाट्य केले या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक संजयजी तळमकर सर यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री इंदेवार सर यांनी केले होते तर कवटिकवार मॅडम द्रोणाचार्य मॅडम चिल्कावार मॅडम आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष हुंडेकर ताई शिक्षण समितीचे सदस्य दिगंबर दुगाळे सखुबाई मंचेवार व गावातील सर्व नागरीक व पालक उपस्थित होते.





Social Plugin