Ticker

6/recent/ticker-posts

प्रामाणिकपणे प्रयत्न करा यश हमखास मिळेल. -- सागर जाधव सर यांचे प्रतिपादन



डॉ.यशवंत पवार कन्नड,  

जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिक्षण महर्षी स्व के के जाधव सर माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज दिनांक १० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री सागर कृष्णराव जाधव सर व प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य संतोष मतसागर सतीश शर्मा काकासाहेब कवडे अविनाश काळे धीरज अग्रवाल संजय भारुका उमेश नटानी सादिक शेख आबेद अली  नंदकुमार शेजवळ मिर्झा बेग यांची उपस्थिती होती

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री सागर जाधव सर यांनी सांगितले की आपण आई वडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवली व प्रामाणिकपणे  प्रयत्न करत राहिलो, तर एक दिवस यश आपणास हमखास मिळते, यावेळी संतोष मतसागर सतीश शर्मा संजय भारुका धीरज अग्रवाल काकासाहेब कवडे यांनी दहावीतील विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या

मागील वर्षाच्या दहावीतील गुणवंत विद्यार्थी ऋतुजा अकोलकर अदनान बागवान यांचा श्री देवेंद्रसिंग राजपूत सर यांच्या वतीने रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला,तसेच सिद्धी बोडखे तनुजा मगर आदित्य वेताळ सिद्ध राठोड या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, यावेळी भूमिका कोळी, जान्हवी राठोड कार्तिक पाटील या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय आठवणींना उजाळा दिला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश जंजाळ व प्रास्ताविक प्रशासकीय अधिकारी श्री सचिन भामरे सर आभार सुनिता दापके यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  जगमोहन मुंडवाडकर दीपक जाधव ज्ञानेश्वर नायकुडे भारत पवार लक्ष्मण पांडव भगवान म्हैसमाळे योगेश कुमावत सुभाष जाधव संतोष आग्रे सुनीता बाविस्कर यांनी अनमोल सहकार्य केले