प्रतिनिधी @ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
डोणगाव/6 फेब्रुवारी:बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी बुलढाणा द्वारा संचालित, इंदिराबाई माधव सावजी सहकार विद्यामंदिर डोणगाव च्या पाच स्काऊटची राज्य पुरस्कारासाठी निवड झाली.
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड, राज्यस्तरीय राज्य पुरस्कार, स्काऊट चाचणी शिबिर दिनांक 6.जानेवारी ते 9 जानेवारी 2026 दरम्यान.राज्य प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये सहकार शाळेचे पाच विद्यार्थी पात्रता चाचणीत यशस्वी झाले. यामध्ये गौरव विजय किरवे, धीरज सुदर्शन साबळे, कृष्णा संदीप बाजड, नैतिक सचिन खवाल, आर्यन जयसिंग राठोड या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुनिल गाढे सर, स्काऊट विभाग प्रमुख स्काऊटर निलेश राठोड, विलास धुमाळ, संदिप पंडीतकर यांच्या मार्गदर्शनात या विद्यार्थ्यांनी राज्य पुरस्कारासाठी तयारी केली होती. या त्यांच्या यशासाठी.
बुलढाणा अर्बन को-आँप क्रेडिट सोसायटी चे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा कोमल झंवर, बुलढाणा अर्बन को-आँप क्रेडिट सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर तसेच, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.





Social Plugin