●ग्रामीण प्रतिनिधी ,महंमदरफी मदार आदमपूरकर, .
नांदेड:मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा मौजे सलगरा बु. येथे आर्थिक साक्षरता जागरूकता मेळावा बुधवार दि.१८ फेब्रुवारी रोजी बँक पदाधिकारी व बँकेच्या ग्राहकांसमवेत संपन्न झाला.
या मेळाव्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील प्रधानमंञी सुरक्षा बिमा योजना,प्रधानमंञी जीवन ज्योती बिमा योजना,बचत गट संदर्भात आदि योजनांची यथोचित माहिती गाव परिसरातील ग्राहकांना देण्यात आली.
यावेळी चांडोळा शाखा व्यवस्थापक प्रफुल्लकुमार पुंडगे,बँक सहाय्यक महमदरफी मदार,सलगरा बु.चे सरपंच सदाशिव कापसे,
बँक बिसी गंगाधर दस्तूरे,मदन गायकवाड,बँक सीआरपी ज्योतीबाई जाधव,ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई म्हेञे,यमुनाबाई श्रीरामे,प्रदीप जाधव व समस्त गावकरी मंडळी आदिंची उल्लेखनीय उपस्थिती होती.





Social Plugin