सतीश पांडे [कळमेश्वर प्रतिनिधी ]
कळमेश्वर :- अत्यंत दुःखद घटना आहे धापेवाडा रोडवर झालेल्या या अपघातात वानराचा मृत्यू होणे क्लेशदायक आहे.कळमेश्वर राष्ट्रीय बजरंग दल चे अध्यक्ष मा. मंगेश गमे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवाकर कडू, राजू धार्मिक, लक्ष्मण ठाकूर, अनुग्रह तिडके, विकास बागडे तत्परतेने घटनास्थळी पोहोचून वानरावर जे अंत्यसंस्कार केले, ते त्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवते. मुक्या प्राण्याबद्दल दाखवलेली ही माणुसकी खरोखरच कौतुकास्पद आहे.या घटनेनंतर परिसरात रस्ते सुरक्षा किंवा वन्यजीव संरक्षण संदर्भात काही विशेष पावले उचलली जावीत असे नागरिकांना वाटते.
धापेवाडा या गावातून जाणारा महामार्ग रस्त्यावर नियमित अपघात होत असतात त्याकरिता उडान पूल वरून तसेच गावातून जाणाऱ्या करिता स्पीड लिमिट ची अंमलबजावणी केली असून सुद्धा फोर व्हीलर टू व्हीलर वाहन अती स्पीड ने चालवून अपघाताला कारण बनतात.
अशा घटनांच्या वेळी तातडीने मदत मिळवण्यासाठी किंवा वन्यजीवांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र वन विभागाच्या (Forest Department) अधिकृत पोर्टलवर माहिती घेऊ शकता किंवा त्यांच्या हेल्पलाइन क्रमांकावर लोकांनी संपर्क साधावा.





Social Plugin