वार्ताहर :लॅकी राठोड
मांडवी ग्रामीण संस्कृतीचा वारसा आणि शेतकऱ्यांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या शंकर पटाचे बैलगाडा शर्यत आज मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. या पटाच्या सुरुवातीला गावाची परंपरा आणि उत्साहाचे दर्शन घडले.मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन गावाचे सरपंच सुमनबाई पेंढोर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक PSI गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच गावातील इतर अनेक मान्यवर, ज्येष्ठ नागरिक आणि पंचक्रोशीतील पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहाचे वातावरण
शर्यत सुरू होण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते मैदाने पूजन आणि बैलांचे पूजन करण्यात आले. सरपंचांनी आपल्या भाषणात खेळाडूंना खिलाडूवृत्तीने खेळण्याचे आवाहन केले, तर PSI साहेबांनी सुरक्षा नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या.





Social Plugin