Ticker

6/recent/ticker-posts

आदमपूर ग्रामीण शेत शिवारात आंबा तुडुंब मोहरला.



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

बिलोली तालुक्यातील आदमपूर परिसरातील काही भागात,शेत शिवारात किंवा बांधावर तुरळक असणाऱ्या आंब्याच्या झाडांना मागच्या कडाक्याच्या थंडीत तुडुंब मोहोर लगडलेला दिसून आला आहे.आंब्याला आलेला मोहोर पाहता यंदा गावरानी आंब्याची रसाळी चव शेतकरी तथा सर्वसामान्य नागरिकांना चाखायला मिळेल असे दिसते आहे.यंदा वर्षातील आम्रवृक्ष मोहोराची ही सुरूवात अंतर्गत मन उधाणत राहते.

अविट गोडीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावरानी आंब्याची झाडे,आमराया, वरचेवर आता दुर्मिळ होत चालल्या आहेत.काही भागात नगण्य आंबा बागायतदार अजुनही आहेत.मागच्या वर्षात वादळी वारे व अवकाळी पावसाच्या तडाख्यात गावरानी आंब्यास प्रचंड फटका बसलेला होता.यावर्षी फुलोरा झाडांना अगदी लदबदून गेला आहे.काही जुन्या जानत्या शेतकऱ्यांकडून  खेडोपाडी गावरानी आंब्याची झाडे आजही राखून ठेवलेली नक्कीच आहेत.

आंबा मोहोरला की वातावरणात एक आगळावेगळा सुवासिक गंध अगदी धुंद दरवळत राहतो.मोहोर आणि घनगर्द सावली पाहता कौटुंबिक स्ञीमन माहेरी जाऊन सलामी देत असते.कैरी आणि पाड लगडल्यावर उनाड पोरांचे टोळके रानोरानी भटकंती करीत निघतात.आंबा हंगामात घरीदारी पाहुण्यांची ये-जा हमखास वाढलेली असते.कौटुंबिक नवीन नात्यांची नाजूक गुंफण घरादारांत बांधलेली असते.

आदमपूर,बिलोली,देगलूर परिसरातील काही नर्सरीतलाआंबा चाखायला बाजारात येतो,माञ,त्याची चव गावरानी फक्कड आंब्यासमोर फिकी पडलेली दिसून येते.विविध गावराणी आंब्याचे वाण बाजारात उपलब्ध होतात.त्यामुळेच कौटुंबिक रसाळी किंवा चव चाखण्यासाठी सर्वसामान्य लोक गावरानी आंब्याची बाजारात मागणी दरसाल करीत असतात.मोहरलेला हा आम्रवृक्ष पाहून खव्वयांच्या तोंडाला आतापासूनच पाणी सुटू लागले आहे.वादळी वारे,पाऊस न लागतावातावरण पोषक राहीले तर आंबे खाणाऱ्यांची यंदा सुग्गी होईल,अशी परिसरातील शेतकऱ्यांकडून आशा व्यक्त केली जात आहे.