Ticker

6/recent/ticker-posts

विजेच्या लोमत्या तारेमूळ शेतकऱ्यांनामध्ये भीतीचे वातावरण नागरिकांनी केली वरिष्ठाणकडे तक्रार



आमेटवार राजेश 


बिलोली - तालुक्यापासून पंधरा किलोमीटर दक्षिणेस असलेल्या हिप्परगा थडी या गावातील लाईट हे सगरोळी येथील 33 केव्ही उपकेंद्र येथून सप्लाय होतो. तिथल्या एम एस सी बी पासून जी लाईन हिप्परगा येथे दिली ती लाईन शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेली आहे. पण ही लाईन जमिनीपासून सहा ते सात फुटावर असून यापासून शेतकऱ्यांस जनावरांस धोका होऊ शकतो मागे काही दिवसांपूर्वी देखील गावातील जनावरे विजेच्या शॉक मुळे मृत्युमुखी पडले होते. या गावात एमएसईबी कर्मचारी न येता त्यांनी कंत्राटी भरती वर घेतलेल्यांना लाईन चेक करण्यासाठी तसेच काही तांत्रिक अडचणी असल्यास त्यांना पाठवून काम चालवतात पण असेच गावातील बरेच अडचणी आहेत जे की डीपी चा प्रॉब्लेम,पापयअप्पा मठवाले यांच्या शेतीच्या कडेवरील विजेचा पोल पूर्ण पणे झुकलेला असून त्यामुळे त्या शेतकऱ्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.वारंवार सांगून देखील कर्मचारी टाळाटाळ करतात.

विजेच्या भीती मुळे शेतकरी मुठीत जीव धरून चालतो.कर्मचारी ऐकत नसल्याने वरिष्ठाकडे तक्रार देण्यासाठी मा. कनिष्ठ अभियंता/ उपकार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वितरण ऑफिस बिलोली येथे गावातील गट क्रमांक 46 या शेताचे मालक शेख दिवाणसाब आणि शेख गौस यांच्या शेतातली लाईनची वायर जमिनीपासून सात ते आठ फुटावर असल्यामुळे ती हाताने पोहोचण्यासारखी आहे.त्यामुळे ट्रॅक्टर ने पल्टी फ्लो,वखाराणी, शेतीची मशागत करण्यासाठी खूप मोठी अडचण निर्माण होत आहे. अशी तक्रार दि. ०२/०२/२०२६ रोजी देण्यात आली.अद्याप महावितरण कंपनीकडून कुठलाही कर्मचारी येऊन याची तपासणी केली नाही जर कोणाची जीवितहानी झाल्यास त्यास कोण जबाबदार आहे. यामुळे गावातील नागरिक संतप्त आहेत जर लवकरात लवकर येऊन ही लाईनचे वायर वरच्या बाजूला ओडून टाईट करून घ्यावे.याकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही संपूर्ण गावकरी एकत्रित पणाने एम एस सी बी ऑफिस पुढे उपोषण करणार आहोत.आणि जर का जीवितहानी झाली तर याला सर्वस्व जबाबदार महावितरण कंपनी असेल असा गावाकऱ्याकडून संतप्त व्यक्त करत आहेत.यावर महावितरण कंपनी काय मार्ग काढेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.