यथील रहिवासी संगिता गोरक्षनाथ फुलारी (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे.संगिता फुलारी या स्वभावाने शांत, प्रेमळ आणि सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या होत्या. त्यांनी आपल्या आयुष्यात कुटुंबासाठी मोठे योगदान दिले असून घरातील सर्व जबाबदाऱ्या अत्यंत कर्तव्यनिष्ठेने पार पाडल्या. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
त्यांच्या पश्चात पती गोरक्षनाथ फुलारी, दोन मुलगे, दोन मुली तसेच नातवंडे व मोठा परिवार आहे. संगिता फुलारी यांच्या अंत्यसंस्कारास गावातील अनेक नागरिक, नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते. सर्वांनी दिवंगत आत्म्यास शांती लाभो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली आहे.





Social Plugin