मन्सूर शहा.चिखली.:------
- दि. २० : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात आयोजित शेतकरी प्रबोधन कार्यशाळेचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले.यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण संदेश दिला केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता शाश्वत शेती व जोडधंद्यांकडे वळाबिजोत्पादन, फळबागा आणि भाजीपाला उत्पादनातून आर्थिक प्रगती साधाकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या शेतकरी हितासाठीच्या कार्याचा गौरव केला.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. पंजाबराव देशमुख प्रादेशिक अर्थव्यवस्था नियमन केंद्र, शिवाजी महाविद्यालय
यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यशाळेनिमित्त शेती उत्पादने, फळे व प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले. शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.कार्यक्रमास जिल्हा कृषी अधीक्षक संतोष डाबरे, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अमोल झापे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.





Social Plugin