Ticker

6/recent/ticker-posts

पाटील कॉलेज मध्ये मोबाईल फोन वरील जीवाणू संसर्गाचे परीक्षण करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन.



प्रतिनिधी : विजय गायकवाड

रिसोड : येथील स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा डॉ अमोल आढाव व प्रा ज्योतीपाल खडसे यांच्या नियोजनाखाली महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयात विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांच्या मोबाईल वरील जिवाणू संसर्गाचे परीक्षण करण्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी या कार्यशाळेविषयी माहिती सांगताना या विभागाचे प्रा ज्योतिपाल खडसे हे म्हणाले की "मोबाईल यावर असणारे सूक्ष्मजीव आणि त्यापासून होणारे आजार व मोबाईलची काळजी किती घ्यायची व नाही घ्यायची याची जनजागृती म्हणून विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे व मोबाईल संदर्भात जनसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून घेण्यात आलेला हा एक दैनंदिन जीवनातील महत्वाचा उपक्रम असुन आपल्याच जवळ 24 तास मोबाईलच्या जीवाणूचे घोंगावणारे वादळ असून सुद्धा आपल्याला माहिती नसते यासाठीच या कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे. असे ते म्हणाले. या उपक्रमात विद्यार्थ्यांपैकी कु नाजीया देशमुख, कु नेहा कागलकर, कु आरती जावळे कु कांचन भुतेकर, कु मेघा देवकर, कु धनश्री बोंडे, कु अनुजा डाखोरे, कु श्वेता डाखोरे, कु श्रुती बेंडवाले, कु गायत्री पवार कु श्रुती बोंडे, कु समृद्धी गारडे, कु संजीवनी खंडागळे, कु कांचन सरोदे , कु रोशनी चेसकुलिया, व केशव पोपळघाट या विद्यार्थी विद्यार्थिनींनी या उपक्रमात भाग घेऊन कार्यशाळा यशस्वी केली.  या कार्यशाळेसाठी प्रयोगशाळा सहाय्यक कु छाया खरबळ यांनी परिश्रम घेतले.