अंबड प्रतिनिधी,
गणेश सपकाळ
श्रीक्षेत्र खोलेश्वर महादेव मंदिर घनसावंगी परिसरात महाशिवरात्रीचे औचित्य साधून भव्य 'कीर्तन महोत्सव सोहळ्या'चे आयोजन करण्यात आले आहे.सोमवार, दि.९ फेब्रुवारी ते सोमवार,दि. १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडणार असून, यानिमित्ताने घनसावंगी परिसरात भक्तिरसाची उधळण होणार आहे.ह.भ.प.रामकृष्ण महाराज कोरडे (नृसिंह वारकरी शिक्षण संस्था) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.सप्ताहाच्या काळात दररोज पहाटे ४ वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होईल.यामध्ये पाहाटे 4 ते 6 काकडा भजन,'7 ते 8 ओम नम:शिवाय' नामजप,सांय 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री ८ ते १० या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत.या महोत्सवात पहिल्या दिवशी ह.भ.प.भागवताचार्य शिवाजंली ताई जरांगे पाटील मातोरी यांच्या कीर्तनाने प्रारंभ होणार असून,त्यानंतर अनुक्रमे ह.भ.प.बंडोपंत महाराज कांगडे, ह.भ.प.भावमूर्ती तुकाराम महाराज गायकवाड, ह.भ.प.पांडुरंग महाराज कंटूले, ह.भ.प.भागवताचार्य ज्ञानेश्वरी ताई सोळंके,ह भ.प.बळीराम महाराज औटे आणि ह.भ.प.तुकाराम महाराज रक्ताटे पाटील यांची कीर्तने होतील.सोहळ्याची सांगता सोमवार,दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प.सुखदेव महाराज गोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने होणार आहे.
या सोहळ्यासाठी दररोज सकाळी आणि सायंकाळी विविध अन्नदात्यांकडून महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गायनाचार्य,मृदंगाचार्य,चोपदार आणि समस्त ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.या आध्यात्मिक सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी घ्यावा,असे आवाहन समस्त गावककरी मंडळी व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





Social Plugin