किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधी
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे श्री संत गजानन महाराज यांचा 148 वा प्रकटदिन उत्साहात साजरा करण्यात आला.श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन माघ वद्य सप्तमी या दिवशी साजरा केला जातो या दिवशी भाविक भक्त श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करतात .23 फेब्रुवारी 1878 रोजी शके 1800 मध्ये माघ वद्य सप्तमीला गजानन महाराज प्रथम शेगाव येथे प्रकट झाले म्हणून हा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो
.अंतुर्ली येथील पाटील वाड्यात श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .अंतुर्ली येथील माधव देशमुख यांच्या निवासस्थानी श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले व आरती करण्यात आली नंतर श्री संत गजानन महाराजांना पिठलं ,भाकर, अंबाडीची भाजी, हरभऱ्याची उसळ व मोतीचूरचा लाडू यांचा नैवेद्य दाखवण्यात आला नंतर ग्रामस्थांनी श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनाचा व जेवणाचा आस्वाद घेतला .तसेच श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी पिठलं, पोळी ,अंबाडीची भाजी, हरभऱ्याची उसळ व मोतीचूरचा लाडू याचा आस्वाद घेतला.अशा प्रकारे अंतुर्ली येथे श्री संत गजानन महाराज यांचा 148 वा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.





Social Plugin