यशवंत पवार
शिवाजी महाविद्यालय, कन्नड येथील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागामार्फत मौजे दाभाडी येथे दि. 12 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. “शाश्वत विकासासाठी युवक, पडीक जमीन व पाणलोट व्यवस्थापन” या समकालीन व समाजाभिमुख विषयाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय भोसले (प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय, कन्नड) होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी व हवामान तज्ञ डॉ. उदय देवळाणकर उपस्थित होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मुक्तारभाई शहा (पंचायत समिती, कुंजखेडा गण कन्नड), श्रीमती अकिलाबी शहा (सरपंच, मौजे दाभाडी), श्री कचरू शिरसाठ (पोलीस पाटील, मौजे दाभाडी), श्री अनिल शिरसाठ (पत्रकार, मौजे दाभाडी), श्री मधुकर अदिक (उपसरपंच, मौजे दाभाडी), श्री फुलचंद मुंडे (ग्रामविकास अधिकारी, मौजे दाभाडी), श्री श्री अरुण अदिक,श्री बाबुरावजी अदिक, श्री कार्तिकाना दाबके (माजी सरपंच, बहिरगाव), कृषी भूषण श्री पोपटराव दापके, श्री गणपतराव खरे, श्री शिंदे काका आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रस्तावना डॉ. राकेश अहिरराव यांनी मांडली. त्यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करताना युवकांनी पडीक जमिनीचे पुनरुज्जीवन, जलसंधारण, मृदसंवर्धन आणि पाणलोट व्यवस्थापन यामध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
प्रमुख पाहुणे डॉ. उदय देवळाणकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, "हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलव्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी पाणलोट व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, जलसाठवण तंत्र आणि मृदसंवर्धन" या बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. युवकांनी विज्ञानाधिष्ठित दृष्टिकोन स्वीकारून ग्रामीण विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय भोसले प्राचार्य, शिवाजी महाविद्यालय कन्नड यांनी "एन.एस.एस. स्वयंसेवकांनी समाजसेवेच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा मार्ग स्वीकारावा, असे प्रतिपादन केले. त्यांनी युवकांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व विशद केले".
या सात दिवसीय शिबिरामध्ये पडीक जमिनीचे सर्वेक्षण, जलसंधारण जनजागृती, श्रमदान, बंधारे स्वच्छता, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, तसेच पर्यावरण विविध विषयावर व्याख्याने व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाधिकारी म्हणून डॉ. प्रकाश महाजन, डॉ. राकेश अहिरराव, डॉ. सीमा काशीद यांनी शिबिराचे नियोजन केले.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ बी के मगर, संयोजन समिती सभासद ग्रंथपाल डॉ. संतोष देशमुख, प्रा. सोमेश्वर मोगरे, प्रा. मदन खुर्दे, प्रा. प्रगती चव्हाण, श्री नानाभाऊ जंजाळ तसेच मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ शिवाजी हुसे, क्रीडा विभाग व एनसीसी प्रमुख डॉ उदय डोंगरे,0 समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर प्रतिभा अहिरे मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र घोती वाणिज्य विभागाचे डॉ मंगेश जाधव तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि एन.एस.एस. स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस स्वयंसेविका जानवी गाडे हिने केले, तर आभार प्रदर्शन एनएसएस स्वयंसेवक यश पाटील यांने केले.
या शिबिराच्या माध्यमातून युवकांमध्ये शाश्वत विकासाची जाणीव निर्माण होऊन ग्रामीण भागातील पडीक जमीन व जलस्रोतांच्या संवर्धनासाठी प्रभावी पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.





Social Plugin