यशवंत पवार कन्नड
स्वर्गीय किसनकाका कोल्हे यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिरची कु. आकांक्षा दलपत चव्हाण हिने उल्लेखनीय यश संपादन करत द्वितीय पारितोषिक पटकावले.
तिच्या प्रभावी वक्तृत्वशैली, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि विचारपूर्ण मांडणीमुळे परीक्षकांनी तिच्या गुणवत्तेची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान केला.
या पारितोषिकामध्ये रु. 3001/- रोख रक्कम, आकर्षक स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला. हा सन्मान थोर कवी व प्रख्यात व्याख्याते अजीम राही यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, ही बाब विद्यार्थिनी व संस्थेसाठी अभिमानाची ठरली.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष साबुसिंग राठोड, उपाध्यक्ष रामदास सुरडकर, सचिव पांडुरंग राठोड, सहसचिव संजय पुरी, कोषाध्यक्षा सरला सोनवणे, संचालक शिवाजी वाघ, संचालक मुकुंद शिंदे, मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थिनीचे तसेच तिच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देत भविष्यातही असेच यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कु. आकांक्षा चव्हाण हिच्या या यशामुळे शाळेचा गौरव वाढला असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!





Social Plugin