Ticker

6/recent/ticker-posts

अपघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या परिवाराकरिता सहाय्य व दोषींवर कारवाई करिता जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर*



 आरिफ खान पठान प्रतिनिधि/मेलघाट

 युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने राणीगाव धारणी मेळघाट येथे झालेल्या वाहन अपघातामुळे मृत्युमुखी पडलेल्या परिवाराकरिता सहाय्य व दोषींवर कारवाई करिता  जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन सादर

अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील शिवाझिरी घाट येथे घडलेल्या भीषण अपघातात ५ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला व १२ जण गंभीर जखमी झाले. ही घटना अत्यंत दुःखद असून सदर अपघात ज्या मार्गावर घडला, त्या रस्त्याचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यावर मोठमोठे गड्डे पडलेले आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून कार्यवाही करावी, मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, जखमींवर शासकीय खर्चातून सर्वोत्तम उपचाराची व्यवस्था करावी व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तत्काळ आवश्यक ते सुरक्षा उपाय राबवावेत अशी मागणी जिल्हाधिकारी अमरावती यांना करण्यात आली.यावेळेस युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.