प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):- गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंद नगरी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कटचिंचोली येथे दिनांक २०/०२ सोमवार रोजी आनंद नगरी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्या ने करुन शाळेतील विद्यार्थ्यांना वेव्हारीक ज्ञान मिळावा. व वेवहार कशा प्रकारे करावा या करीता शाळेत पहिली ते सहावी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून, खांदे पदार्थ विक्री साठी ठेवले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे सरपंच, उपसरपंच यांनी केले.
सकाळी ०९ ला कार्यक्रम सुरू झाला होता. या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. व शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवल्याल्या पदार्थांचा खरेदी करून खाद्यपदार्थाचा स्वादिष्ट आनंद घेतला. शाळेचे मुख्याध्यापक यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला उपस्थित गावचे श्री.सरपंच रविंद्र निवारे, उपसरपंच ज्ञानेश्वर कोकणे,शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर, श्री विशाल सर, कदम सर,शाळेचे सर्व शिक्षक,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री.मारोती गाडगे,उप अध्यक्ष मधुकर औटी, व शालेय समितीचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य सुनिल अंगरखे व सुंदर औटी, रामभाऊ सोनवणे, सोपान कोकणे, संदेश येवले, सोमनाथ कोकणे, राहुल औटी, सचिन कोकणे,फतुभाई पठाण,बाबा पठाण,योगेश हाटवटे व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.





Social Plugin