Ticker

6/recent/ticker-posts

भटक्या-विमुक्त समाजावरील अन्याय सहन करणार नाही; ​आम्ही आदिवासी आहोत आदिवासी सवलती मिळवणारच-लक्ष्मणराव माने.


बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

हैदराबाद गॅझेट नुसार त्याच गॅझेटमध्ये  आम्ही अनुसूचित जमातीमध्ये (ST) समावेश असलेल्या भटक्या-विमुक्त समाजाच्या ४२ जातींना त्यांच्या हक्कापासून का दूर ठेवले जात आहे? असा सवाल उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी उपस्थित केला. केला असून , आम्ही  आदिवासी आहोत व आदिवासी सवलती मिळवणारच अशी संतप्त मागणी माजी आमदार पद्मश्री लक्ष्मणराव माने यांनी केली आहे.

सातारा जिल्हा भटक्या-विमुक्त जमाती संघटनेच्या वतीने आयोजित जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते.

​यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या दुटप्पी धोरणाचा तीव्र निषेध केला असून, समाजाच्या हक्कासाठी लवकरच सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार असल्याचे जाहीर केले.

​मुख्य मुद्द्यांवर प्रहार

​त्याच गॅझेटमध्ये नमूद असलेल्या विमुक्त १४ आणि भटक्या २८ जातींवर अन्याय का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

​ आमच्या समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलनाची सुरुवात साताऱ्यातून केली जाईल. असा इशारा श्री लक्ष्मणराव माने यांनी दिला यावेळी ​नूतन कार्यकारिणीचा गौरव आणि उत्साहात स्वागत करण्यात आले.

​कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाध्यक्ष दिलीपकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नूतन जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका अध्यक्षांना नियुक्तीपत्र, शाल आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर मेढा नगरपंचायतीच्या नूतन नगरसेविका सौ. सोनाली पवार यांचा लक्ष्मण माने यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांना समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हाभर सक्रिय राहण्याचे आवाहन केले.

​कार्यक्रमातील प्रमुख उपस्थिती व पुढील मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली

या मेळाव्याला राज्य सरचिटणीस नारायण जावळीकर, रामभाऊ जाधव, राज्य उपाध्यक्ष मच्छिंद्र जाधव, माजी जि.प. सदस्य दत्ता पवार, हरिदास जाधव, अशोक जाधव, आणि दीपक जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे ​सूत्रसंचालन राज्य सरचिटणीस रामचंद्र जाधव यांनी केले

​आभार प्रदर्शन श्रीरंग जाधव  (जिल्हा सरचिटणीस) यांनी मानले.

[​"आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार आहोत. साताऱ्यातील मोर्चा ही केवळ सुरुवात असेल, इथून संघर्षाची मशाल संपूर्ण महाराष्ट्रात पेटवू."]

— पद्मश्री लक्ष्मण माने