Ticker

6/recent/ticker-posts

*सहकार विद्या मंदिर दे मही येथे संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे मही येथे दि.23/02/2026 ला संत गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार विद्या मंदिर चे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री खेडेकर सर ,चेके सर,विमल शिंगणे मॅडम हे होते ..या कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणजे संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेत आलेला विद्यार्थी ..शाळेत अनेक मुलांनी स्वचतेच महत्त्व सांगितले ..व त्यानंतर शाळेतील विधर्थ्यांनी हातात झाडू घेऊन देऊळगाव मही गावातील ठिकठिकाणी स्वछता केली ..सुरवातीला आठवडी बाजार येथे स्वच्छता केली ,त्यांनतर बौद्ध विहार ,दिग्रस चौक ,व ग्रामीण रुग्णालय दे मही व नंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व परिससारतील स्वच्छता विध्यार्थ्यांनी केली..हे उत्कृष्ट कार्य पाहून गावातील लोकांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले..सदर प्रभात फेरीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर,पर्यवेक्षक श्री खेडेकर सर ,केशव तळेकर सर,रोहित सर,शिवशंकर शिंगणे सर,डोईफोडे सर , गणेश चव्हाण सर,प्रवीण खिल्लारे सर मोरे मॅडम व दंडाले मॅडम व पत्रकार अमोल बोबडे आणि असंख्य गावकरी उपस्थित होते..सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी व मुख्याध्यापक यांच्या कल्पकतेतून शिक्षकांनी राबवलेल्या या सामाजिक उपक्रमाची संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरला..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ दंडाले मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन शिवशंकर शिंगणे सर यांनी केले..सदर कार्यक्रमासाठी व स्वछता फेरी उपक्रमाबाबत शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षककेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले..