गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
सविस्तर वृत्त असे की हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून वाशिम जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी संघटन पर्व' अभियानाच्या पूर्वतयारीसाठी आज कारंजा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात हे अभियान १५ दिवस चालणार असून, याद्वारे तालुक्यात शिवसेनेचे जाळे अधिक घट्ट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
बैठकीला जिल्हा सचिव नागेश घोपे, तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे, विधानसभा समन्वयक राज पाटील चौधरी ओबीसी सेनेचे तालुकाप्रमुख अमोल पाटील भिंगारे , युवासेना विधानसभा प्रमुख अजय भाऊ मते,युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल पाटील गाडे,शहर प्रमुख अरुण बिकड, शहर संघटक ॲड. संदेश जिंतूरकर,वैद्यकीय प्रमुख शुभम भोयर, उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील तुरक, उपतालुकाप्रमुख, अमोल भाऊ उगले, धनज सर्कल प्रमुख संदीप पाटील टेकाडे, काजळेश्वर सर्कल प्रमुख संदीप पाटील लाहे, मनभा सर्कल प्रमुख शंकर भाऊ खोरगडे, मा. पंचायत समिती सदस्य रवी भाऊ भुते, युवासेना उपतालुकाप्रमुख सागर मुंदे, उपसर्कल प्रमुख संजय शिंदे,काजळेश्वर ओबीसी सर्कल प्रमुख सतीश घराडे. क्षमानंद निमगडे,सर्कल प्रमुख गोपाल कडू,डीगंबर एकनार, अमोल घुसळकर, नईम भाई,राजेंद्र भोजने, गणेश धाये, संतोष आप्पा परसवार , विलास डोंगरे, प्रसन्ना काळबांडे,आदींची उपस्थिती होती.





Social Plugin