Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनेच्या वतीने गाडगे बाबा यांची जयंती साजरी

 


गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

शिवसेना कारंजा तालुक्याच्या वतीने २३ फेब्रुवारी रोजी विश्राम गृह कारंजा येथे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हासचिव नागेश भाऊ घोपे, हे प्रामुख्याने उपस्थित होते.तालुका प्रमुख मंगेश पाटील मुंदे, विधानसभा समन्वयक राज पाटील चौधरी ओबीसी सेनेचे तालुकाप्रमुख अमोल पाटील भिंगारे , युवासेना विधानसभा प्रमुख अजय भाऊ मते,युवा सेनेचे तालुकाप्रमुख अमोल पाटील गाडे,शहर प्रमुख अरुण बिकड, शहर संघटक ॲड. संदेश जिंतूरकर,वैद्यकीय प्रमुख शुभम भोयर, उपतालुकाप्रमुख सुरेश पाटील तुरक, उपतालुकाप्रमुख, अमोल भाऊ उगले, धनज सर्कल प्रमुख संदीप पाटील टेकाडे, काजळेश्वर सर्कल प्रमुख संदीप पाटील लाहे, मनभा सर्कल प्रमुख शंकर भाऊ खोरगडे, मा. पंचायत समिती सदस्य रवी भाऊ भुते, युवासेना उपतालुकाप्रमुख सागर मुंदे, उपसर्कल प्रमुख संजय शिंदे,काजळेश्वर ओबीसी सर्कल प्रमुख सतीश घराडे. क्षमानंद निमगडे,सर्कल प्रमुख गोपाल कडू,डीगंबर एकनार, अमोल घुसळकर, नईम भाई,राजेंद्र भोजने, गणेश धाये, संतोष आप्पा परसवार , विलास डोंगरे, प्रसन्ना काळबांडे व आदी पदाधिकारी उपस्थित होते 

यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या स्वच्छता, सामाजिक समता, शिक्षण व अंधश्रद्धा निर्मूलन या विचारांवर प्रकाश टाकत त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले.