Ticker

6/recent/ticker-posts

सहकार विद्या मंदिर दे येथे विज्ञान दिन मोठया उत्साहात संपन्न



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे मही येथे जेष्ठ वैज्ञानिक सी व्ही रमण यांच्या स्मृती प्रित्यर्थ विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते..

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक श्री खेडेकर सर,नंदकिशोर पडघान सर ,विशाल शिंगणे,समाधान भुतेकर सर, पूजा मॅडम,प्राजक्ता देशमुख मॅडम हे होते ..सदर विज्ञान दिवसासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध व आकर्षक अप्रतिम प्रकल्प तयार करून कार्यक्रमाला रंगत आणली...विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कलाकृती खूप महत्वाच्या असतात.त्या दृष्टीने हा विज्ञान दिवस एक आगळा वेगळा ठरला..सदर कार्यक्रमध्ये एम. के. सी. एल.या संगणकामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमानपत्रांचे वाटप प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले..तसेच काही विध्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले .तर श्री बनसोडे सर यांनी विज्ञान दिनाचे महत्व सुंदर पद्धतीने सांगितले..सदर कार्यक्रमासाठी राहुल शेळके सर ,नितेश पालवे सर ,व तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर पऱ्हाड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री रमेश तळेकर सर यांनी केले..