देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के
सिंधुदुर्गात विकासाला नवीन दिशा लवकरात लवकर सुरू होणार आता सागरी महामार्ग, जलमार्ग सेवा १ मार्चपासून चालू होणार आहे. तेव्हा कोकणात प्रवाशांच्या सेवेसाठी, पर्यटकांसाठी, रोजगाराला चालना मिळण्यासाठी, तसेच कोकणामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या अडचणींच्या समस्या लक्षात घेऊन रस्त्यावरील गाडीचे ट्रॅफिक व गाडीने जाणारा वेळ वाचण्यासाठी कोकणामध्ये रो रो ही बोट सेवा चालू करण्याचे शासनाने निर्णय घेतलेले आहे. ही बोट एक तारीख ला चालू होणार आहे असे सांगण्यात येत आहे. तेव्हा त्या दृष्टीने सागरी महामंडळाने तसेच सुरक्षा यंत्रणा ने बंदर विकास यांनी सुरक्षेचे साठी महत्त्वाची पावले असे उचललेली आहेत.
ही बोट चालू करण्याचे प्रयत्न बंदर विकास व मत्स्य विकास मंत्री माननीय श्री नितेश नारायण राणे व माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस व शिवसेनेचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रयत्नाने चालू करण्यात आलेली आहे. तेव्हा कोकणातील जनता यांचे आभारी आहेत. आणि त्यांचे कौतुक ही करत आहेत. कित्येक दिवस कोकणातील बोटि या बंद अवस्थेत होत्या त्या आता चालू करण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. सध्या जरी तिकीट जास्त असली तरी कालांतराने तिकीट कमी होण्याची शक्यता आहे. कारण असे की आता बोटीची सुरुवात होत आहे पहिला बोटीचा महामार्ग हा व्यवस्थित सुरळीत होऊन दे त्यानंतर टप्प्याटप्प्याने मुंबईचे गोवा हा सागरी मार्ग व त्यांची बंदरे विकास करण्याचे काम शासन हाती घेणार आहे. हळूहळू पूर्वीप्रमाणे या बोटी सर्व कोकणातील बंदरे घेणार आहे. कोकणातील प्रत्येक गावातील लोकांना या बोटीने जाता येणार आहे. सुरुवातीला तिकीट जास्त असली तरी काही काळाने ही टिकीट कमी करण्यात येईल व बोटीचे प्रकार सुद्धा बदलण्यात येतील असे कोकणातील ग्रामीण स्थानिक लोकांचे मत आहे. कोकणातील बोटीचा फायदा सगळ्या स्तरावर होणार आहे. सुरक्षेतेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा कोस्टल गार्ड, कस्टम, सागर रक्षक दल, सागरी मेरीटाईम बोर्ड, स्थानिक ग्रामस्थ यांचा सहभाग असणार आहे. सध्या कोकणातील रस्ते हे कॉंक्रिटीकरण या कामाच्या स्वरूपात त्यांचे काम चालू आहे. त्यामुळे एसटी महामंडळ प्रायव्हेट बस सेवा व प्रवाशांच्या गैरसोयीवर भरपूर ताण पडत आहे. त्यामुळे कोकणात बोटी चालू होणे हे फार आवश्यक आहे. या बोटीमुळे अनेक बंदरे विकास होऊन सागरी किनारे व रोजगारला कोकणामध्ये चालना मिळेल. पर्यटकांना या बोटीचा चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येईल.
भविष्यामध्ये मुंबई ते गोवा ही बोट सेवा पूर्वीप्रमाणे चालू होणार आहे असे स्थानिक लोकांनी मत व्यक्त केलेले आहे या संदर्भात. तेव्हा या कोकणातल्या बोटी एक मार्च पासून चालू होणार आहे. अशा या बोटी व्यवस्थितपणे प्रवाशांना ए जा आणण्याकरता फार उपयुक्त असे ठरणार आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाने हे महत्त्वाचं पाऊल कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे उचललेले आहे. तेव्हा कोकणातील जनतेने महाराष्ट्र शासनाचे आभार मानलेले आहे व ही सेवा व्यवस्थित व सुरळीत पार पाडो ही ईश्वरचरणी सर्व कोकणवासीयांची प्रार्थना





Social Plugin