बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
यशस्वी होण्यासाठी शाळा आत्मविश्वास निर्माण करतात.विद्यार्थ्यांनी परीक्षेची आकारण भीती वाटू घेऊ नये तो उत्सव समजावा. आयुष्यात सकारात्मकता ठेवा. आई वडील व गुरुजणांचे संस्कार विसरू नका. जुन्या नव्या गोष्टीचा ताळमेळ घालून नवनिर्माण करा. चिकित्सक वृत्ती ठेवा. ज्ञान काही वाया जात नाही. ज्ञान व वेळेचा योग्य वापर केल्यास आयुष्य यशस्वी बनते.
असे विचार श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पुसेगावचे पर्यवेक्षक प्रा. श्री मोहनराव गुरव यांनी मांडले.ते यशवंतराव चव्हाण हायस्कूल जायगाव ता. खटाव येथे इयत्ता 10 वी विद्यार्थी शुभचिंतन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते.संस्था अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.आर. के. देशमुख यांनी संस्थेच्या वतीने शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक श्री जगदाळे एस.आर. यांनी प्रास्ताविक केले.
श्री भंडारे सर व श्री इनामदार सर, श्री फिरोज मुलाणी सर यांनी शिक्षक मनोगते व्यक्त केले.कार्यक्रमास श्री छगनशेठ देशमुख,श्री अशोक देशमुख,श्री प्रभाकर देशमुख, श्री हणमंतशेठ यादव, सौ सुनंदा राऊत,श्री दिनकरशेठ शिंदे, श्री चंद्रकांत देशमुख, श्री किसन बाबा देशमुख, ग्रामस्थ, आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.कु. पूर्वा देशमुख, कु. भावना शिंदे, वेदांत हजारे, प्रतीक्षा जाधव यांनी विद्यार्थी मनोगते व्यक्त केली.श्री देशमुख यांनी आभार व्यक्त केले.
छायाचित्र -जायगाव - मार्गदर्शन करताना श्री मोहनराव गुरव, समवेत श्री आर. के. देशमुख, श्री अशोकराव देशमुख, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक श्री जगदाळे व अन्य छाया - प्रकाश राजेघाटगे बुध





Social Plugin