Ticker

6/recent/ticker-posts

चांडोळा बँकेचा कोळगांव येथे साक्षरता मेळावा संपन्न

 


●ग्रामीण प्रतिनिधी ,महमदरफि मदार आदमपूरकर

नांदेड:मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा 'वित्तीय साक्षरता कँप' हा

मौजे कोळगांव येथे आर्थिक साक्षरता जागरूकता मेळावा शुक्रवार दि.१३ फेब्रुवारी रोजी 

बँक पदाधिकारी व बँकेच्या ग्राहकांसमवेत संपन्न झाला.

या बँक मेळाव्याचा मुख्य उद्देश लोकांना बँकिंग,बचत,कर्ज,बजेट,

विमा,डिजिटल पेमेंट,प्रधानमंञी सुरक्षा विमा योजना,प्रधानमंञी जीवन ज्योती बिमा योजना आदि

सरकारी योजनांची माहिती देणे

 हा आहे.सदरील कार्यक्रमातून ग्राहकांना पैसे व्यवस्थापित करण्याची योग्य माहिती होऊन 

ते आत्मनिर्भर आर्थिक निर्णय घेऊ शकतात.

यावेळी चांडोळा शाखा व्यवस्थापक  प्रफुल्लकुमार पुंडगे,बँक सहाय्यक महमदरफी मदार,बँक सखी राणी येळगे,सीआरपी मंगल येळगे,बीसी

मदन पाटील,कोळगांव सरपंच राजाबाई श्रीरामे,ग्रामसेवक गोपवाड व्यंकट,ग्रामपंचायत सदस्य गोविंद श्रीरामे,सामाजिक कार्यकर्ते केरबाजी गायकवाड,सोसायटी चेअरमन देविदास पाटील,नारायण वडजे,बाबूराव गायकवाड व समस्त गावकरी मंडळी आदिंची उल्लेखनीय उपस्थिती होती.