Ticker

6/recent/ticker-posts

उंबरठाण्यात मधुमक्षिका प्रशिक्षण देण्यात आले.

 


भवाडा प्रतिनिधी  पी के गावित

      भारत मे मिट्टी क्रांती की पहल ग्राम उद्योग विकास योजना हनी मिशन कार्यक्रम के अंतर्गत 2025-2026 खादी ग्राम उद्योगाचा कार्यक्रम आपल्या सुरगाणा तालुक्यात पहिल्यांदाच उंबरठाण येथे राबविण्यात आला. या प्रशिक्षणासाठी एकूण गावे भवाडा आणि अंबाठा, आमझर व सुळे वा., आमदा प. आणि खोकरविहीर, बेंडवळ आणि अलंगुन या गावातील प्रशिक्षणार्थी आणि सहभागी होता.

       यामध्ये जंगलातील मधाची वैशिष्ट्ये मधमाशीचे संरक्षण कसे करावे. मधमाशीची पर्यावरणाला कसे चांगले असते. मधमाशी ही शेती उत्पादन वाढीसाठी खूप फायदेशीर ठरत असते. यामध्ये प्रत्यक्ष सर्व सर्व विषयावर प्रत्यक्ष करून दाखविले ते  मास्टर ट्रेनर म्हणजे एस एस टरार कार्यकारी अधिकारी केंद्रीय मधमाशी अनु संसाधन यवं प्रशिक्षण संस्थान भारत सरकार आणि खादी व ग्राम उद्योग भारत सरकार . धरमपुर चे  प्रमुख UTMT चे मधुकरभाई भोये श्री प्रकाश गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले. तर सेवावर्धिनीचे प्रकल्प समन्वयक मधुकर चोथवा ग्राम स्थरीय सहाय्यक गणेश पवार आणि पुष्पराज गावित हे उपस्थित होते