Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद हायस्कूल लोहगाव येथे राष्ट्रसंत संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी.


स्वच्छतेचा संकल्प, समाजजागृतीचा संदेश आणि मान्यवरांचा सन्मान

बिलोली प्रतिनिधी - आमेटवार राजेश

बिलोली : जिल्हा परिषद हायस्कूल, लोहगाव येथे राष्ट्रसंत, थोर समाजसुधारक व स्वच्छता प्रणेते संत गाडगेबाबा यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा उजाळा देत उपस्थित मान्यवरांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.संत गाडगेबाबांनी आपल्या आयुष्यात स्वच्छता, साधेपणा, अंधश्रद्धा निर्मूलन आणि समाजजागृतीचा जो महान संदेश दिला, तो आजही तितकाच प्रेरणादायी आहे. 

“स्वच्छता हीच खरी सेवा” हा त्यांचा मूलमंत्र आचरणात आणण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.या पावन दिनाचे औचित्य साधून स्वच्छताप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाणारे एल. एम. मुंडकर सर, लोहगाव नगरीतील स्वच्छता दूत भगवानराव पाटील हांडे तसेच शाळेच्चा प्रगतीसाठी अहोरात्र मेहनत घेणारे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिगंबरराव काचमोडे यांचा शाळेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला व त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे शाळेचा अंतर्बाह्य परिसर स्वच्छ करून संत गाडगेबाबांच्या विचारांना कृतीतून अभिवादन केले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण व्हावी आणि समाजात सकारात्मक बदल घडवावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्वच्छता राखण्याचा आणि समाजप्रबोधनाचा संकल्प करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव कोंडावार व अशोकराव गायकवाड यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते..