Ticker

6/recent/ticker-posts

सीआरपीएफ जवान श्रीराम चिगळेचे प्रशिक्षण पूर्ण; आदमपुरात जल्लोषात स्वागत.



ग्रामीण प्रतिनिधी-महमदरफी मदार आदमपूरकर 

सीआरपीएफ जवान श्रीराम चिगळे चे आदमपुरात जंगी स्वागत 

(प्रशिक्षण पूर्ण करून आल्यानंतर गावी जल्लोषात घोड्यावरून मिरवणूक)

आदमपूर:बिलोली तालुक्यातील ग्राम आदमपूर येथील युवा सीआरपीएफ जवान श्रीराम धोंडिबा चिगळे हा केंद्रीय राखीव पोलीस दलातील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून सोमवार दि.१६ फेब्रुवारी सायंकाळी गावी परतल्याने आदमपूरात त्याचे गावकऱ्यांकडून वाजत गाजत पारंपरिक घोड्यावरून स्वागत व अभिनंदन करण्यात आले.

येथील अल्पभूधारक शेतकरी धोंडिबा चिगळे व आई सौ.विमलबाई चिगळे यांचे हे एकुलते एक पुञ आहेत.

सन २०२४ डिसेंबर अखेरीस यांची 'सीआरपीएफ-ट्रेड्समन' म्हणून निवड झाली होती. जि.प.शाळा व महाळप्पा पटने विद्यालयात प्राथमिक,माध्यमिक, सौ.मंजुळाबाई महाविद्यालय येथे उच्च माध्यमिक तर नायगांव येथील श्री दत्त महाविद्यालयात पदवीचे मुक्त शिक्षण त्याने घेतलेले आहे.त्यानंतर तब्बल अकरा महिन्यांचे पायाभूत खडतर सैन्य प्रशिक्षण तमिळनाडूतील चेन्नई केंद्रात पूर्ण झाले आहे.प्रशिक्षण पूर्ण होताच लगोलग त्याची छत्तीसगड राज्यात नेमणूक झालेली आहे.गावी व शहरात राहून त्याने हे यश मिळवून 

आपल्या आई वडीलांचे कष्टप्रद श्रम सार्थकी ठरवले आहे.

या आगमनाबद्दल आई,वडील, आजी माजी ग्रामपंचायत प्रतिनिधी, सहशिक्षक,व्यावसायिक, व्यापारी, पञकार, गावातील प्रतिष्ठित नागरिक,नातलग,मिञ व समस्त गावकऱ्यांनी श्रीराम चे स्वागत,सत्कार करीत अभिनंदन केले आहे.देशाची सेवा करण्याची अभूतपूर्व संधी आणि देशसेवेत ग्रामीण भागातील अधिकाधिक तरूणांनी यावे,

अशा प्रेरक भावना श्रीरामने वृत्तपत्र प्रतिनिधींशी व्यक्त केल्या आहेत.