Ticker

6/recent/ticker-posts

भारत फोर्जने कामगारांचे पगारवाढ करतो म्हणून माझी फसवणूक केली --- रमेश उबाळे .



जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि  26 पासुन बेमुदत  उपोषण, कामगारांसाठी प्राणाची आहुती देणार 

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

कामगारांच्या पगारवाढीचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक करणाऱ्या जरंडेश्वर रेल्वे स्टेशनजवळील भारत फोर्ज या कंपनीच्या विरोधात दि. 26 पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे.  असा इशारारिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे नेते रमेश उबाळे यांनी दिला आहे.कामगारांसाठी माझा प्राण गेला तरी पर्वा करणार नाही. असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान याप्रकरणी रमेश उबाळे यांनी सातारा पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. 

       याबाबत बोलताना रमेश उबाळे म्हणाले, ज्या कामगारांनी भारत फोर्ज कंपनीच्या हितासाठी कष्ट घेतले,  13 ते 14 वर्षे घाम गाळला या घामाचा मोबदला  कामगारांना मिळायला पाहिजे  अशी आपली प्रामाणिक  भावना आहे. परंतु या कंपनीच्या मालकाची कातडी ही गिधाडाची आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. कामगारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीने मुश्किल झाले आहे. पगार  आज वाढवू उद्या वाढवू म्हणून 13 ते 14 वर्षे कामगारांना रबवून घेतले परंतु त्यांना आद्याप नोकरीत कायम केले नाही. व पगार वाढही केला नाही. गेल्या 13 - 14 वर्षात दुप्पटी, तिप्पटीने महागाई झाली आहे. तरीही पगार वाढ झाली नाही  मुलांचे शिक्षण, आरोग्याचा खर्च   कुठून करायचा  असा कामगारांना प्रश्न पडतो  दररोज कामगारांच्या कुटूंबातील लोक रडत आहेत तरीही कंपनीला दया येत नाही. कंपनीच्या मालकाचे काळीज दगडाचे आहे काय? 

    सर्व कामगार एकच काम करतात तोंड पाहून काहीमर्जीतील लोकांचा पगार वाढ केली आहे.  सर्वांना सारखा न्याय दिला पाहिजे.  याप्रकरणी आपण कामगार सहाय्य्क आयुक्ताना निवेदन दिले होते त्यांनी चौकशी करण्याचे आश्वासन दिले परंतु चौकशी झालीच नाही. फोन केल्यावर फोन घेत नाहीत.  आयुक्त व कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये आर्थिक देवाण- घेवाण झाली आहे असा आपणास संशय आहे. भारत फोर्जच्या   या कामगारांच्या प्रश्नासाठी आपण दि. 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता परंतु त्यावेळी सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. तांबे साहेब यांच्या मध्यस्थिने आत्मदहन आंदोलन स्थगित केले होते. कंपनीने कामगारांना पगारवाढ तसेच कायम करण्याचे आश्वासन दिले होते परंतु हे आश्वासन खोटे होते हे आपल्या लक्षात आल्याने पुन्हा आपण दि. 26 फेब्रुवारीपासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहे. कामगारांचे प्रश्न  सुटावेत म्हणुन माझ्या प्राणाची आहुती  द्यायला तयार आहे. असेही रमेश उबाळे म्हणाले.

    निवेदनाच्या प्रती राज्याचे उपमुख्यमंत्री, कामगारमंत्री, पालकमंत्री, पोलीस अधीक्षक,सहाय्य्क कामगार आयुक्त यांना दिल्याचे रमेश उबाळे म्हणाले.