Ticker

6/recent/ticker-posts

कळमेश्वर मध्ये 'गण गण गणात बोते' च्या गजरात पालखी यात्रा.



सतीश पांडे (कळमेश्वर प्रतिनिधी)

कळमेश्वर : शहरातील गजानन नगर कुळलकर वाडी संत्रा मार्केट येथील श्री संत गजानन महाराज देवस्थान कमिटीच्या वतीने प्रगट दिन महोत्सव भक्तिभावाने साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी महाराजांचा अभिषेक व आरतीने महोत्सवाला सुरुवात झाली. 'गण गण गणात बोते'च्या जय घोषात मंदिरातून महाराजांची भव्य पालखी दि 10 ला काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या पालखी यात्रेत कलशधारी महिला, दिंडीतील गजर आणि भक्तांच्या जयघोषाने वातावरण भक्तीमय झाले होते.

पालखी यात्रेत शहर व परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग नोंदविला. ठिकठिकाणी रंगीबेरंगी रांगोळ्या काढून, पुष्पवर्षाव करण्यात आले.

सकाळी कीर्तनकार ह.भ.प.सचिन काळे महाराज ( ग्रामगीताचार्य ) यांच्या प्रभावी गोपाल काल्याचे कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. सायंकाळी श्री ची भव्य भव्य शोभायात्रा काढण्यात आली सुमधुर भजनांनी कार्यक्रमात आध्यात्मिक रंग भरला.पूजन करून पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहर भ्रमणानंतर पालखी मंदिरात परतली. 

याप्रसंगी डॉ. राजीव पोतदार यांनी मंदिरात उपस्थित राहून श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले. समारोपीय कार्यक्रमात देवस्थान कमिटीच्या वतीने आयोजित महाप्रसादाचा शेकडो भाविकांनी लाभ घेतला. प्रगट दिन सप्ताह महोत्सवाच्या आयोजना साठी देवस्थान कमिटीच्या सदस्यांनी सहकार्य केले.

इतर कीर्तनकारांनीही अत्यंत प्रभावीपणे कीर्तन सादर करत भक्तांना विठ्ठलनामाच्या गजरात रंगवले. समारोपप्रसंगी हजारो तसेच दुपारी 12 वाजता भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण सप्ताह काळात भक्तिभाव, शिस्तबद्ध नियोजन आणि गावकऱ्यांचे सहकार्य यांचे सुंदर दर्शन घडले.