Ticker

6/recent/ticker-posts

१८ फेब्रुवारीला शेतकरी भवन कारंजा लाड येथे विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन.



गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी). 

           जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांच्या सहकार्याने दगडूजींग नाईक शिक्षण प्रसारक संस्था, लोहगाव महागाव यांच्या संयुक्त विद्यमाने अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी विशेष रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना थेट नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे. हा रोजगार मेळावा मंगळवार, दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी शेतकरी भवन, कारंजा लाड, जि. वाशिम येथे सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत पार पडणार आहे. मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करणार आहेत. यामध्ये बी.एस्सी., बी.ए., बी.कॉम., बी.ई., एमबीए, डी. फार्म, एमसीए, बीसीए, बी.टेक, एम.टेक तसेच इतर पदवीधारक व पॉलिटेक्निक उत्तीर्ण उमेदवारांना सहभाग घेता येणार आहे. नव्याने पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांनाही या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी आपले अद्ययावत बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड तसेच शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. तसेचउमेदवारांनी कॉर्पोरेट ड्रेस कोडनुसार औपचारिक शर्ट-पॅन्टमध्ये उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या विशेष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पात्र अल्पसंख्यांक उमेदवारांना नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त अल्पसंख्यांक युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त प्रवीण खंडारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.