Ticker

6/recent/ticker-posts

मराठी नाट्यकलेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार’निळी टोपी’



मराठी नाट्यकलेचा सर्वोत्कृष्ट आविष्कार म्हणून ज्या नाटकांचा उल्लेख करता येईल असे नाटक म्हणजे निळी टोपी’ हे नाटक असुन अख्ये तीन तास प्रेक्षकाला हसत खेळत पण मानवी मनाच्या व -हदयाच्या संवेदना जागे करणाचे सामर्थ्य निळी टोपी या नाटकात आहे.

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये शेकडो वर्षापासून मागासवर्गीय समाज बांधवांना अस्पृश्य म्हणून अमानवीय वागणूक कशी दिली जात होती ? 

मालक तुमच्या ….
वाढ ये माय….
शिळ, उष्ट, पाष्ट….

हा सर्व संवाद सर्व प्रेक्षकाच्या डोळयात आश्रुला पाझर फोडणारा आहे.व संवेदनशील नागरीकाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आहे.प्राचीन भारतात आर्य व नाग लोकांमध्ये झालेल्या करारापासुन ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्मयोगातून शिका, संघटीत व्हा व अन्यायांच्या विरुद्ध संघर्ष करा… या संदेशाद्वारे मागासवर्गीय समाजात क्रांती कशी झाली याचे उत्तम सादरीकरण या नाटकात केलेले आहे.

आज एकविसाव्या शतकात मागासवर्गीय बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सन्मान कसा प्राप्त झाला? याची उत्तम मांडनी या नाटकात केलेली आहे.पूर्वी मागासवर्गीय समाजला कसे हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या ? याचे वास्तव, जिवंत आणि न भूतो.. असे सादरीकरण पहायला मिळालै.

  *नांदेडच्या कलाकारांनी ‘निळी टोपी’ या नाटकातून दिलेला संदेश 

बाबासाहेबांच्या पाया पडल्यानंतर बाबासाहेबानी त्या अनुयायाला त्यांनी मारले व पाया पडण्यापेक्षा माझे विचार डोक्यात आण , शिक्षणाची कास धर… अभ्यास कर…दिलेला हा संदेश खुप प्रेरणादायी आहे.प्रस्तुत नाटकात देगलूर महाविद्यालयाचा विद्यार्थी कपिल कांबळे (गुडसूरकर) यांनी देखील विशेष भूमिका पार पाडली आहे. एक प्राध्यापक म्हणून आपल्या विद्यार्थ्यांचा कलाविष्कार पाहताना खुप समाधान वाटले.

सदरील निळी टोपी या नाटकावर प्रतिक्रिया देताना लवकरच एक सुंदर मराठी व हिंदी भाषेमध्ये चित्रपट तयार होईल असा मनात विश्वास वाटत आहे.लेखक/दिग्दर्शक राहूल दि. जोंधळे यांचे अभिनंदन 

‘*निळी टोपी’ या नाटकाचे प्रयोग भारतभर होणे आवश्यक आहे.*(प्रतिक्रिया प्रा. डॉ. बालाजी कतुरवार लोकप्रशासन विभागप्रमुख  देगलूर महाविद्यालय, देगलूर