Ticker

6/recent/ticker-posts

महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार - सौ. सोनियाताई राजदेव.



पारनेर प्रतिनिधी 

             श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने पौर्णिमेनिमित्त आरतीचे नियोजन करण्यात आले होते ,आणि यावेळी टाकळी ढोकेश्वर जिल्हापरिषद गटाच्या इच्छुक उमेदवार सोनियाताई राजदेव यांनी हळदी कुंकु कार्यक्रमाचे नियोजन केले होते ,यावेळी मोठ्या संख्येने माता भगिनी ग्रामस्थ उपस्थित होते.

             यावेळी सोनियाताई राजदेव म्हणाल्या महिलांना सक्षमीकरण करणे काळाजी गरज आहे ,आता पर्यंतच्या इतिहासात फक्त चूल आणि मूल ह्या गोष्टीमुळे महिलांची प्रगती थांबलेली होती ,परंतु आजच्या काळात महिला शिकल्यामुळे विविध क्षेत्रात महिला प्रगतीवर आपल्याला पाहायला मिळत आहे .

          या कार्यक्रम प्रसंगी श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बबनशेठ उंडे , हा भ प धनंजय महाराज उदावंत, हा भ प बजरंग महाराज आंधळे,उपाध्यक्ष,तसेच सचिव सुभेदार आंधळे मेजर ,तुकाराम कोकाटे , हरिशेठ उंडे , कृष्णा कोकाटे ,रायचंद मुळे ,सचिन वाफारे, विश्वनाथ दरेकरत्याच बरोबर कार्यक्रमाचे आयोजन वर्षाताई मुळे, पुष्पा आंधळे , सुशाबाई कोकाटे तसेच संगीता आंधळे , नंदबाई मुळे , अनिता कोकाटे ,संध्या आंधळे ,विद्या वाफारे,स्वाती आंधळे ,रतन कोकाटे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

         हळदी कुंकू चालू होण्यापूर्वी देवस्थानच्या वतीने सोनियाताई राजदेव यांचा ट्रस्टच्या वतीने सन्मान करून शुभेच्या दिल्या.