Ticker

6/recent/ticker-posts

पाटील महाविद्यालयात जागतिक पाणतळ दिन संपन्न.



रिसोड प्रतिनिधी :- विजय गायकवाड

रिसोड :-  येथील स्व पुष्पादेवी पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम एन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा डॉ के एम रंजळकर यांच्या नियोजनाखाली जागतिक पाणथळ भूमी दिनानिमित्त सामंजस्य करारा अंतर्गत (MoU)आंतर-महाविद्यालयीन राष्ट्रीय स्तरावरील आभासी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये स्व पुष्पादेवी पाटील कॉलेज व आर्य कॉलेज वाशिम या दोन कॉलेजनी सहभाग घेतला होता.  यामध्ये वनस्पतीशास्त्र विभागाने २ फेब्रुवारी २०२६ रोजी “जागतिक पाणथळ भूमी दिना” निमित्त आंतर-महाविद्यालयीन राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.

 उपस्थित विद्यार्थ्यांपैकी, महाराष्ट्र, तेलंगाना, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश या वेगवेगळ्या राज्याचे 350 च्या वर पदवी/पदव्युत्तर/संशोधक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेतील सर्व ई-पोस्टर्सची रेखाचित्रे ही वन्यजीव संवर्धन, पुनर्संचयन व नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत वापरावर आधारित होती. ज्या विद्यार्थ्यांनी आपली प्रश्नमंजुषा सादर केली व स्पर्धेत भाग घेतला त्यांना ई-प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.  या राष्ट्रीय प्रश्नमंजुषेचा मुख्य उद्देश हा भारतातील तसेच जगभरातील पाणथळ जागांबद्दलचे ज्ञान अद्ययावत करणे आणि सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व सामान्य लोकांमध्ये त्यांच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा डॉ ए पी भगत मॅडम व प्रयोग शाळा परिचर जगदीश बोडखे यांचे सहकार्य लाभले.