Ticker

6/recent/ticker-posts

आखिल भारतीय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बुधचा प्रथम वर्धापनदिन सोहळा

 


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

आखिल भारतीय अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र बुधचा प्रथम वर्धापनदिन सोहळा शनिवार दि . १४ फेबुवारी रोजी संपन्न होत आहे . यानिमित्ताने दिवसभर विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती बुध केंद्राचे सेवेकरी यांनी दिली .  शनिवारी सकाळी साडेसात वाजता अक्कलकोटवरून श्री स्वामीच्या पादुकांचे आगमन , आठ वाजता भूपाळी , आरती व चारित्रसारामृत पाठवाचन , सकाळी १o.३० वाजता महानैवेद्य आरती  , सकाळी ११ते १र वाजता श्री स्वामी समर्थ ११ माळी नामस्मरण , दुपारी दोन वाजता श्री स्वामी समर्थ महाराजाची पालखी सोहळा , भव्य दिव्यरथ यात्रा संपूर्ण गावातून निघणार आहे .  पादुकांचे दर्शन व पालखी सोहळयाला बुध पंचक्रोशितील भाविकांनी हजर रहावे , असे आवाहन सेवेकरी यांनी केले आहे .