Ticker

6/recent/ticker-posts

विरमराठा प्रतिष्ठान, सायगाव ता. खेड, जि. पुणे यांचा शिवजयंती उत्सव उत्साहात शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांचे प्रभावी व्याख्यान.







दिनकर बोरकर|प्रतिनिधी

 सायगाव – विरमराठा प्रतिष्ठान, सायगाव यांच्या वतीने शिवजयंती उत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. परिसर भगव्या पताकांनी आणि आकर्षक सजावटीने नटला होता.

यावेळी प्रमुख आकर्षण ठरले शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांचे प्रभावी व्याख्यान. आपल्या ओजस्वी आणि अभ्यासपूर्ण शैलीत त्यांनी शिवकाळाचा जिवंत अनुभव श्रोत्यांसमोर उभा केला. स्वराज्य स्थापनेची प्रेरणादायी गाथा, शौर्य, दूरदृष्टी आणि व्यवस्थापन कौशल्य यांचा परामर्श देताना सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले होते.

कार्यक्रमास ग्रामस्थ, युवक-युवती, महिला वर्ग तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वांनी शिवरायांच्या आदर्शांचे पालन करण्याचा आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प केला.

उत्सवामुळे सायगाव परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले असून, वीर मराठा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.