Ticker

6/recent/ticker-posts

रामधूनच्या निनादात देवबर्डीत स्वच्छतेचा संदेश.



सतीश पांडे कळमेश्वर प्रतिनिधी 

कळमेश्वर : गुरुदेव सेवा मंडळ पेन्शननगर, नागपूर यांच्या वतीने देवबर्डी येथे रामधूनसह ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्वच्छता आणि सामाजिक जागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे गावात भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने ६६ गावांमध्ये जाऊन स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवड यासारखे विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात आले असून, मंडळाच्या या सातत्यपूर्ण कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष प्रा. रामदास टेकाडे, उपाध्यक्ष सोनकुसरे, सहसचिव सतीश राईकवार, कोषाध्यक्ष मधुकर धोटे, सहकोषाध्यक्ष दामोदर मामुलकर, रामराव डांगोरे, वसंतदास कुंभारे, मनोहर हेडाऊ, निकडे, अरुण राऊत, वसंत फरतोडे, विजय गिरी, तेजराम करडे, प्रभाकर भुसारी गोविंदराम श्रीरामे, सचिव रमेश महाराज, शंकर गुळांदे, प्रशांत गुळांदे यांच्यासह गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.