बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्य .व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये इयत्ता 10 वी शुभचिंतन व वार्षिक पारितोषीक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला . गुणवत्तेबरोबर संस्कार ही जोपासले जावे असे मत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था अजिव सेवक व सातारा विभाग प्रमूख प्राचार्य शशिकांत काटे यानी व्यक्त केले . यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व विद्यालयाची माजी विद्यार्थी शितल सदाशिव बोराटे सहाय्यक अभियंता महावितरण महाराष्ट्र शासन बीड विभाग हीने आपल्या मनोगता मध्ये सांगितले की मला जे यश मिळाले आहे त्यामध्ये शाळेतील शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन व त्यावेळी केलेली मदत यामुळे स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून यशापर्यंता पोहचू शकले . विद्यार्थ्यांनी कितीही मोठे यश मिळवले तरी त्यांच्या मध्ये नम्रता असणे गरजेचे आहे . आई वडीलांचे संस्कार व त्यांनी घेतलेले कष्ट याची जाणिव असणे गरजेचे आहे ,असे मत मांडले . शितलने 5000 रु शाळेसाठी मदत केली .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे, स्वामी विवेकानंद व संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी यांनी संस्था प्रार्थाना व स्वागतगीत गायले . मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे वतीने करण्यात आले . विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये विद्यालयत राबवित असलेले उपक्रम , विद्यार्थी यांनी विविध स्पर्धेत मिळवलेले यश तसेच माजी विद्यार्थी करत असलेली मदत याबद्दल माहिती सांगितली .
10वी च्या विद्यार्थिनी मुस्कान मोमीन, तन्वी पात्रेकर, अस्मिता चव्हाण, पूर्वा जगताप यानी शालेय जीवनात आलेले अनुभव सांगितले . 9वी चा विद्यार्थी विश्वजीत दडस याने यांने दहावीच्या विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या . तसेच शिक्षक मनोगता मध्ये नाना दडस व कल्पना नारागुडे यांनी मनोगते व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या .तसेच सरपंच सुजाता बोराटे मनोगता मध्ये शुभेच्छा . यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपसरपंच व सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयराजे घाटगे यांनी आपल्या भाषणात सांगितले की ग्रामपंचायत व माजी विद्यार्थी विद्यालयाच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सर्वोतोपरी मदत करत आहे त्याप्रमाणेच संस्थेनेही इमारत बांधण्यासाठी तसेच शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी लक्ष द्यावे असे सांगितले . तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत चव्हाण यांनी देखील विद्यालयातील प्राचार्य , शिक्षक व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती बाबात मत मांडले . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थांना प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सत्कार केला . तसेच दहावी विषयाचा100% निकाल लागल्याबद्दल पत्रकार प्रकाश राजेघाटगे यांच्याकडून शिक्षकांचाही सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
यावेळी विद्यालयाची आदर्श विद्यार्थिनी म्हणून अक्षरा समाधान कुंभार व आदर्श विद्यार्थी म्हणून विश्वजीत नाना दडस यांचा सत्कार रोख रक्कम व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित शितल बोराटे , प्राचार्य शशिकांत काटे, सरपंच सुजाता बोराटे, अभयसिंह राजेघाटगे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य चंद्रकांत चव्हाण , दयानंद जगदाळे , राहुल जगदाळे तसेच पाटील एस .व्ही ., कावणे एस डी, किरण जाईकर, विद्या बोराटे, सदाशिव बोराटे व ग्रामस्थ व बक्षिसदाते उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व बक्षिस वितरण वाचन भगवान सरवदे , प्रा विलास नाळे यांनी केले मान्यवरांचे आभार संजय माने यांनी मानले . दुपारच्या सत्राचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संदिप पोमण सहा . पोलिस निरीक्षक पुसेगाव पोलीस स्टेशन यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी त्यांनी विद्यार्थी यांनी स्पर्धा परीक्षा देऊन यश मिळवावे व समाजाचा विकास साधावा असे आव्हान केले . तसेच कायद्याचे पालन विद्यार्थी , पालक व समाजातील सर्व घटकांनी करावे असे आव्हान केले व विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या .यावेळी प्राचार्य अंकुश भांगरे यांनी संदिप पोमण , पत्रकार प्रकाश राजेघाटगे , माजी प्राचार्य के.डी पवार सर , प्रकाश पतके यांचे स्वागत केले . यावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते . यावेळी बुध व बुध पंचक्रोषी ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी विद्यार्थी , पालक ,शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी प्राचार्य यांचे सहकार्य मिळाले व कार्यक्रम संपन्न झाला





Social Plugin