डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल पुसेगाव वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक समारंभ उत्साहात संपन्न
बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
विद्यार्थ्यांनी आदर्श नागरिक बनावे. प्रामाणिकपणा जपावा. लीड सारख्या अभ्यासाचे स्कूलचे कौतुक केले. ग्रामीण भागात विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहेत. स्पर्धा परीक्षेला सामोरे जात आहेत अशा विद्यार्थ्यांना घडवताना या शाळेने राबवलेली उपक्रम आदर्शवत आहेत. विद्यार्थ्यांनी पैशाने श्रीमंत न होता ज्ञानाने श्रीमंत व्हावे असे विचार गटविकास अधिकारी श्री.योगेश कदम यांनी व्यक्त केली श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावच्या डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूल पुसेगाव या स्कूलमध्ये पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी सपोनि संदीप पोमण होते .
सपोनि संदीप पोमन यांनी स्पर्धा परीक्षेचे व शालेय अभ्यासक्रमाचे तसेच व्यायामाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमास संस्था अध्यक्ष डॉ. श्री सुरेशराव जाधव, उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशस्तिपत्रक, ट्रॉफीl देऊन कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे योगेश कदम साहेब, सपोनि संदीप पोमन , संस्था सचिव श्री. मोहनराव जाधव , खजिनदार श्री. लक्ष्मणराव जाधव , विश्वस्त श्री. विश्वनाथराव जाधव , श्री. योगेश देशमुख , आणि गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री. सूर्यकांत जाधव उपस्थित होते. गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी स्कूलचे प्रशासकीय अधिकारी डी.पी. शिंदे. यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कूल च्या मुख्याध्यापिका कु. धनश्री पोतदार , तसेच विविध शाखेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय गोफणे , सौ. निलम खटावकर यांच्या हस्ते करण्यात आला व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आले.
सर्व विद्यार्थी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सौ.तृप्ती भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. कु. धनश्री पोतदार यांनी प्रस्तावना केली,सौ. आम्रपल्ली गायकवाड यांनी अहवालवाचंन केले. सौ.शोभा जगदाळे यांनी आभार मानले.





Social Plugin