भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे .
तालुका प्रतिनिधी
मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड:-
स्वानंद सुख निवासी संत कुलभूषण महात्मा श्री नगद नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री.संत गजानन महाराज मंदिर, गजानन नगर गेवराई येथे दि.२१ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२६ दरम्यान भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भक्तगण मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संत नगदनारायण महाराज पुण्यतिथी सोहळा समिती, गेवराई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
गेवराई शहरातील श्री.संत गजानन महाराज मंदिर, गजानन नगर येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्वानंद सुख निवासी संत कुलभूषण महात्मा श्री.ह.भ.प. नगद नारायण महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त वै.ह.भ.प. गुरूवर्य महंत महादेव महाराज नारायणगड यांच्या कृपाशिर्वादाने व प्रेरणेने श्री.ह.भ.प.प्रेममुर्ती महंत शिवाजी महाराज (मठाधिपती श्रीक्षेत्र नारायणगड) यांच्या शुभहस्ते व मार्गदर्शक: श्री.ह.भ.प. संभाजी महाराज (उत्तराधिकारी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान)यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दि.२१ फेब्रुवारी पासून भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कीर्तन महोत्सवात ख्यातनाम कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे यामध्ये शनिवार दि.२१ फेब्रुवारी .ह.भ.प.बाळासाहेब म.रंजाळे (श्रीरामपुर), रविवार ह.भ.प.डॉ.हनुमान महाराज ठाकुरबुवा, सोमवारी श्री.ह.भ.प. मच्छिंद्र महाराज निकम, मंगळवारी श्री.ह.भ.प. दयानंद महाराज कोरेगावकर, बुधवारी श्री.ह.भ.प. श्रावण महाराज अहिरे,
गुरुवार ह.भ.प.पांडुरंग महाराज शितोळे शास्त्री आळंदी ,शुक्रवार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे तर शनिवार दि.२८ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत श्रीक्षेत्र नारायण गडाचे महंत प्रेममुर्ती गुरूवर्य श्री. ह.भ.प.शिवाजी महाराज यांच्या रसाळ वाणीतून अमृततुल्य काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संत नगदनारायण महाराज पुण्यतिथी सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
@ चौकट-
गेल्या १५ वर्षांपासून कीर्तन महोत्सवातून समाज प्रबोधनाचा संदेश
संत नगदनारायण महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी भक्तिरसाने ओथंबलेल्या या कीर्तन महोत्सवात हरिनामाच्या माध्यमातून गेल्या १५ वर्षांपासून समाज प्रबोधनाचा संदेश दिला जातो. संत परंपरेचे विचार, नैतिक मूल्ये, संस्कार आणि समाज एकतेचा संदेश या महोत्सवातून दिला जातो. हा सोहळा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक दृष्ट्याही महत्त्वाचा ठरत असून या कीर्तन महोत्सवात शहरासह ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात दरम्यान संत गजानन महाराज मंदिर परिसरात आकर्षक मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. शिस्तबद्ध आयोजन नियोजन, भाविकांसाठी सुविधा व भक्ती भावाचा उत्साह यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरणार आहे.





Social Plugin